चोपडा येथे राष्ट्रीय काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा,काँग्रेस चे माजी जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील यांच्या हस्ते धजारोहण..!

चोपडा येथे राष्ट्रीय काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा,काँग्रेस चे माजी जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील यांच्या हस्ते धजारोहण..!

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी):-


चोपडा :– शहर व तालुका काँग्रेस च्या वतीने आज दि २८ डिसेंबर रोजी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना दिनानिमित्त
काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी काँग्रेस चे माजी जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील यांच्या हस्ते पक्षाचे धजारोहण करण्यात आले.


धजारोहण नंतर पक्षाच्या बैठकीत ऍड संदीप पाटील म्हणाले की,राष्ट्रीय काँग्रेस हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष असून या राजकीय पक्षाची स्थापना २८ डिसेंबर १८८५ मध्ये करण्यात आली.
संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येऊन ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली.राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सरकार व जनता यांच्यामध्ये एक संवादात्मक स्वरूपाची वाटचाल सुरू असून स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान अनुयायी होते.काँग्रेसच्या पक्षीय राजकारणामध्ये नेहरू आणि गांधी घराण्याचे योगदान महत्त्वपूर्ण राहिलेले आहे.यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील,तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील,
शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे ,माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील,अनिल पाटील आदी होते.यावेळी
चोपडा तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीत नवनियुक्त काँग्रेसचे संचालक देविदास सोनवणे,ऍड एस डी
पाटील,के डी चौधरी राजेंद्र पाटील,सुनील
बागुले यांचा सत्कार ऍड संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.


यावेळी कार्यक्रमास तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील जाहीर खान, वजाहत काझी , मासुम तडवी,धनंजय पाटील, आरिफ सिद्दिकी, बी एम पाटील, छगन पाटील, मासूम तडवी, फातिमा पठाण, मंगेश भोईटे, ज्ञानेश्वर धनगर,संजय महाजन, प्रा.विलास दारुटे ,योगिता शशिकांत चौधरी,मोहन पाटील, नरेंद्र पाटील,मोहन पाटील,विजय पाटील,प्रकाश पाटील प्रवीण पाटील,देवकांत चौधरी, दादू धनगर,ज्ञानेश्वर कोळी,रज्जाक शेख गुलाब बरेला, लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते. संचलन नंदकिशोर सांगोरे तर आभार प्रदीप पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More