पोलीस स्थानकाच्या आवारातच अडावदचा पोलिस कमर्चारीने स्वीकारली लाच; पंटरसह एसीबीच्या जाळ्यात !

पोलीस स्थानकाच्या आवारातच अडावदचा पोलिस कमर्चारीने स्वीकारली लाच; पंटरसह एसीबीच्या जाळ्यात !


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-


वाळूचे ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारणाऱ्या चोपडा तालुक्यातील अडावद पोलीस स्थानकात पंटरला जळगाव एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारतांना रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यालाही ताब्यात घेतल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. कॉन्स्टेबल योगेश गोसावी व खाजगी पंटर चंद्रकांत कोळी असे संशयितांची नावे आहेत.


तक्रारदार यांनी कर्जाद्वारे ट्रॅक्टर घेतले होते. ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करू देण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी संशयित पोलीस कर्मचारी कुंभार यांनी पाच हजारांची लाच मागितली. मात्र, तक्रारदार यांची इच्छा नसल्यामुळे त्यांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने तक्रारीनंतर सापळा रचला. त्यानंतर अडावद पोलीस स्थानकाच्या आवारातच खाजगी पंटरने लाच स्वीकारताच गोसावी यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. एसीबीचे उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More