चोपडा महाविद्यालयातील वाणिज्य विभाग तर्फे सराफ बाजाराचा सर्वे

चोपडा महाविद्यालयातील वाणिज्य विभाग तर्फे सराफ बाजाराचा सर्वे..

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी


चोपडा महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य विभागातर्फे आज दिनांक २०फेब्रुवारी २०२३ रोजी चोपडा शहरातील सराफ बाजारातील सराफ व्यावसायिकांचा सर्वे करण्यात आला यामध्ये महाविद्यालयातील टी वाय बी कॉम च्या विद्यार्थ्यांनी एक प्रश्नावली तयार करून चोपडा शहरातील सराफ व्यावसायिक यांच्या थेट मुलाखती घेऊन व प्रश्नावली द्वारे त्यांच्याकडून विविध माहिती मिळवून त्यांचा सर्वे करण्यात आला .

या सर्वे मध्ये विविध गोष्टी जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही प्रश्न व्यवसायिकांना विचारले त्यामध्ये व्यवसायाची सुरुवात केव्हापासून झाली तसेच सुरुवातीला व्यवसाय करत असताना किती कर्मचाऱ्यांची संख्या त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये गुंतवलेले भांडवल व्यवसायासाठी कुठल्या प्रकारे जाहिरात केली जाते तसेच आपण व्यवसाय करत असताना आपला कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून खरेदी करतात कशाप्रकारे खरेदी करतात जीएसटी किती देतात त्याचप्रमाणे काही अंधश्रद्धा व श्रद्धा यांना ग्राहक बळी पडतात का अमावस्या असेल तर अमावस्येच्या दिवशी ग्राहक सोने-चांदी खरेदी करतात की नाही किंवा ग्राहक सोने-चांदीची कोणत्या दिवसांमध्ये जास्त प्रमाणात खरेदी करतात सणासुदीमध्ये ग्राहकांकडून सोने-चांदीची खरेदी जास्त होते का तसेच होत असेल तर ग्राहक सोने नाणे खरेदी करत असताना किंवा चांदी खरेदी करत असताना मुहूर्त व वेळ पाहतात का त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी ग्राहक सोने खरेदी करतात का? करत नसतील तर का करत नाहीत या सर्व गोष्टींबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी महाविद्यालयातील टी वाय बी कॉम च्या विद्यार्थ्यांनी हा एक आधुनिक सर्वे केला यामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांनी जाऊन तेथील दुकान मालकांना प्रश्नावली द्वारे प्रश्न विचारून माहिती गोळा केली व त्या माहितीचे रूपांतर एका अहवालामध्ये केले.

हा अहवाल बनवल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी देखील हा उपयुक्त ठरणार आहेत यातून विद्यार्थ्यांना व्यवसायिकांचा उद्देश तसेच सराफ व्यवसायिक कशा पद्धतीने व्यवसाय करतात सोने कशा पद्धतीने खरेदी करतात व त्याची विक्री कशा पद्धतीने करतात हॉलमार्क किंवा विविध प्रमाणके यांचा वापर कसा केला जातो २४ कॅरेट २२ कॅरेट सोणे कशा पद्धतीने खरेदी केले जाते किंवा त्याची विक्री कशा पद्धतीने केली जाते तसेच २४ कॅरेट २२ कॅरेट कॅरेट सोने यांच्या बद्दल विद्यार्थ्यांनी विविध माहिती जाणून घेतली याप्रसंगी टी वाय बी कॉम वर्गातील काही विद्यार्थी तसेच विभाग प्रमुख डॉ.सी. आर. देवरे,श्री.व्ही.जी.दारूंटे,सहा.प्रा. चेतन बाविस्कर व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More