अल्पवयीन १७ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या रोड रोमियोला दिला चोप # चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..
चोपडा शहरात काही दिवसा पासून कॉलेज रोड वर पंचायत समितीचा समोर असलेल्या मिलन टी हाऊस जवळ येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या सादिक लियाकत मिर राहणार आझाद चौक याला घटनास्थळी जमलेल्या लोकांकडून मारहाण झालेली असल्याने त्यास वैदयकीय उपचाराकरिता पाठविण्यात आलेले आहे.

अल्पवयीन विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादित दि. २८/०९/२०२४ रोजी सकाळी ०७.३० वा. चे सुमारास यातील अल्पवयीन फिर्यादी हो तिच्या मैत्रिणी यांचेसह
चोपडा बस स्टॅण्ड येथून एम.जी. कॉलेजला जात असतांना चोपडा शहरात पंचायत समिती समोरील मिलन टि हाऊस जवळ यातील आरोपी सादिक लियाकत मिर हा फिर्यादीकडे टक लावून पाहून इशारे करीत असल्याने तसेच फिर्यादी व तिच्या मेत्रिणी अशा नेहमी कॉलेजला जात असतांना एक महिन्यापासून आरोपी हा सदर ठिकाणी थांबून फिर्यादीकडे टक लावून पाहत असल्याने आज रोजी फिर्यादीने आरोपीतास काका तुम्ही इकडे या, तुम्ही नेहमी आमचे कडेस का पाहत असतात, असे बोलली असता, आरोपी हा फिर्यादी जवळ आला व फिर्यादीचा उजवा हात पकडून फिर्यादीच्या स्त्रि मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन फिर्यादीचा विनयभंग केला म्हणून भा.न्या.सं. कलम ७४,७९ सह बालकांचे लैंगीक अपराधांपासुन संरक्षण अधिनिय २०१२ चे कलम ८,१२ प्रमाणे चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे पुढील तपास पो.नि. कावेरी कमलाकर करत आहे














