दातृत्वशाली जयेश व सौ.मिनल बेहडे दाम्पत्याकडून कमला नेहरू मुलींच्या वस्तीगृहात शालेय साहित्य व सॅनिटरी पॅड वाटप

दातृत्वशाली जयेश व सौ.मिनल बेहडे दाम्पत्याकडून कमला नेहरू मुलींच्या वस्तीगृहात शालेय साहित्य व सॅनिटरी पॅड वाटप


चोपडा दि.13(प्रतिनिधी)तालुक्यातील सुप्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर सतीश जी बेहडे यांचे चिरंजीव जयेश सतीश बेहडे व पत्नी सौ मिनल जयेश बेहडे या दाम्पत्याने गरजू गरजवंत आदिवासी विद्यार्थिनींना शालेय साहित्य व सॅनिटरी पॅड देऊन मोलाचा हात दिलेला आहे.


शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था संचलित कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहात अत्यंत हलाखीची दयनीय परिस्थिती असलेल्या विद्यार्थिनी निवासीत असल्याची माहिती घेत जयेश सतिश बेहडे व सौ.मिनल बेहडे यांनी वस्तीगृह गाठून सर्व विद्यार्थीनींशी चर्चा करून वही, कंपास व सॅनेटरी पॅड देऊन मुलींना हातभार दिला आहे. त्यांच्या दातृत्वशाली हृदयाला सलामी ठोकत स्वागत गीत गाऊन विद्यार्थ्यांनी जोरदार स्वागत केले. विद्यार्थींनींच्या शैक्षणिक अडीअडचणी समजावून घेत वेळोवेळी मदतीसाठी धावून येण्याचे आश्वासित केले. या यावेळी वस्तीगृह अध्यक्ष महेश शिरसाठ यांनी बेहडे परिवार नेहमीच गरजवंताच्या पाठीशी उभे राहत असल्याने त्यांचे आभार मानले.अधीक्षक कावेरी कोळी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More