फैजपुर शहरात यापूर्वी बाहेर पेठ भागातील एका महिलेसह दोन जणांना खरोळा चा संसर्ग झाला झाला होता यामुळे शहरात प्रथमच कोरोनाव्हायरस विषयी मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली होती. मात्र हे दोघेही रुग्ण सुदृढ होऊन रमजान ईदच्या दिवशी 25 मे संध्याकाळी सुखरूप घरी पोचले होते आणि शहराने मोकळा श्वास घेतला होता.मात्र आज पुन्हा शहरातील एक कोरोना योद्धा असलेले 41 वर्षीय पोलीस अधिकारी यांना covid-19 संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्या शहरात पुन्हा कोरोना बाधित झाले आहेत.सदर पोलीस अधिकारी यांना आज पुढील उपचारार्थ जळगाव येथील सेंटरमध्ये रवाना करण्यात आले या प्रसंगी त्यांना व त्यांच्या परिवारास धीर देण्यासाठी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे मुख्याधिकारी किशोर चव्हाण मंडळाधिकारी जेडी बंगाळे सहाय्यक पोलीस उप अधिकारी रोहिदास ठोंबरे आदी कोरोना योद्धा याप्रसंगी उपस्थित होते.नंतर सदर पोलीस अधिकारी रहिवासी असलेले बस स्थानक मागील भाग हा निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात कारवाई सुरू झाली आहे.या परिसरातील नागरिकांनी पुढील आदेश होईपावेतो कोणत्याही सबबी घराबाहेर निघू नये असे आव्हान प्रशासनाने केले आहे. या बाबी नागरिकांनी घाबरून न जाता आपल्यासह परिवाराची काळजी स्वतः घ्यायची आहे.शहरात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून आपले कर्तव्य दक्ष अधिकारी जीवपणाला लावून राबणारे अधिकारी यांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे.यावरून मला काही होणार नाही या भ्रमातून शहरवासीयांनी बाहेर पडू नये व शासन प्रशासनाच्या आदेशांना कोणत्याही परिस्थितीत पायमल्ली करू नये.
पोलिस ठाण्यात त्या अधिकारीचे कार्यालय सील करण्यात आले आहे.












