चोपडा तालुक्यात अल्पवयीन मुलीनं बाळाला दिला जन्म चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

चोपडा तालुक्यातील भावाळे गावात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने घरातच बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

चोपडा तालुक्यातील पिडीत अल्पवयीन फिर्यादी वय १६ वर्षे रा.भवाळे ता.चोपडा जि. जळगाव हिचा प्राथमिक आरोग्य केंद्र हातेड ता.चोपडा येथे महिला पोलिस उपनिरीक्षक कविता ढाणगे नेमणुक अमळनेर पोलीस स्टेशन यांनी जबाब नोंदविला असता सदर पिडीत हिन जबाब दिला की पिडीत हि अंदाजे दोन वर्षापुर्वी भवाळे गावातील भिलाटी मधील बाजारात गेलो असता त्यावेळी पिडीत हिस दिपक भिल हा भेटला होता तेव्हा पासुन त्या दोघांमध्ये ओळख झाली होती. त्यावेळी दिपक भिल हा मला म्हणाला कि तु माझ्या सोबत राहशील का? पिडीत हिने त्यास नाही म्हणत असतांना सुध्दा तो पिडितेसोबत हासी मजाक करित होता. म्हणून त्यास पिडीत हिने सोबत हो म्हणाली होती.

त्यानतंर अंदाजे दिड वर्षापुर्वी तारिख माहित नाही दिपक भिल हा पिडित हिचे घराजवळ भेटला व पिडीत हिस दिपक भिल याने विचारले कि मला तुझ्या सोबत प्रेम करायचे आहे लवण (नाल्या) मध्ये चल असे बोलून पिडीत हिस फूस लावून तिचे आई वडिलांचे कायदेशीर रखवालीतून घेवुन जावुन पिडीत हिचा अल्पवयाचा फायदा घेवून तिचेवर त्या दिवशी दुपार पासुन सांयकाळ पर्यत भवाळे शिवारात शारिरीक संबंध (लैगिक संबंध प्रस्थापित करुन पिडीत हिस गर्भवती केले त्याबाबत पिडीत हिने ०५ महिन्याची गर्भवती असतांना दिपक भिल यास गर्भवती असल्याची माहिती दिली असता दिपक भिल याने पिडीतेला तु काहीपण कर असा म्हणाला त्यानतंर दि.२४/०२/२०२६ रोजी भवाळे गावी तिचे राहते घरी अविवाहित असतांना पुरुष जातीचे बाळ दिला आहे. तक्रारी जबाव वरुन भारतीय न्याय संहिता कलम १३७(२),६४(१),६४(२)(i),६४(२) (m), ९६, वालकांचे लैगिक अपराधापासुन संरक्षण अधि.२०१२ (एल), ७,८,११,१२, प्रमाणे कलम ३,४,५ प्रमाणे चोपडा ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मा.पोनि सो यांच्या आदेशान्वये पुढील सपोनि शेषराव नितनवरे करत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More