प्रेयसीची हत्या करत प्रियकराने स्वतःलाच संपवले चोपडा तालुक्यातील अक्कुलखेडे येथील घटना

चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथे जगदीश काशिनाथ पाटील यांच्या राहत्या घरात अनिता जगदीश पाटील वय ४० वर्ष देवा सुरेश धनगर वय ४० वर्ष नामक व्यक्ती रक्तबंबड अवस्थेत आणि त्याच्या घरात आढळून आले. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास जगदीश काशिनाथ पाटील यांची मुलगी शाळेतून घरी परत आल्यानंतर तिने रक्तात माखलेले दोघे मृतदेह पाहून हंबर्डा फोडला आणि घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली.

जगदीश काशिनाथ पाटील यांची पत्नी अनिता जगदीश पाटील व देवा सुरेश धनगर यांचे आपसात सोशल इंस्टाग्रामचा माध्यमातून प्रेम प्रकरण जोडलेले होते. काही दिवसांपासून प्रियसी अनिता ही देवा धनगर यांना वेळ देत नसल्या कारणाने रागातून देवा धनगर यांनी रागाच्या भरात अनिता पाटील यांच्या राहत्या घरी अकुलखेडा येथे जाऊन गावठी पिस्टलने अनिताच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली. आणि नंतर स्वतःवरही देवा धनगर याने गोळी झाडून स्वतःलाही संपवले.

घटनास्थळी मयत देवा धनगर यांची दुचाकी आढळून आली ती दुचाकी पोलिसांनी जप्त केली. घटनेची माहिती मिळतातच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येथे ठेवण्यात आले. पुढील तपास अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली मधुकर सावळे हे करीत आहेत. दोघांच्या मृतदेहांना पोस्टमॉर्टमासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More