चोपडा नगर परिषदेतर्फे अधिकारी व कर्मचाऱ्याच्या आरोग्य तपासणी शिबिर संपन्न


चोपडा (प्रतिनिधी):- दि.३० रोजी चोपडा नगरपरिषदे मार्फत नगरपरिषद रुग्णालयाकडून कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणारे कर्मचारी करीता आरोग्य तपासणी व करोना विषाणू बाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करणेत आले. सदर शिबिरास न.प.चोपडा आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी व सफाई कामगार असे एकूण १६८ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छता विभागा मार्फत दैनंदिन साफसफाई व सार्वजनिक आरोग्याची कामे अखंडितपणे सुरु असुन कोव्हिड-१९ बाबत शहरात फवारणी, कोव्हिड केअर सेंटर येथे साफसफाई, रस्ते सफाई, नाले सफाई, बेवारस प्रेत अंत्यसंस्कार इ. जोखमीचे कामे करत असतांना कर्मचा-यांना करोना विषाणूची लागण होवू नये याकरीता जनजागृती व योग्य ते मार्गदर्शन आवश्यक असल्याने सदर शिबिराचे आयोजन करणेत आले.


न.प.रुग्णालयातील वैद्दकीय अधिकारी डॉ.श्री.चंद्रकांत बारेला यांनी कोव्हिड-१९ ची लक्षणे, प्रसार व प्रादुर्भाव तसेच विषाणूची लागण टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी इ. बाबत मार्गदर्शन केले. तसेच पावसामुळे डबकी साचून संभावित डेंग्यु, मलेरिया रोखणेकामी देखील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती दिली. या शिबिरा अंतर्गत सर्व सफाई कामगारांची आरोग्य तपासणी करणेत येवून आवश्यकते नुसार मोफत औषध उपचार देणेत आले. आरोग्य तपासणी करतांना थर्मल स्क्रिनिंग करुन शरीराचे तापमान, पल्स ऑक्सीमीटरव्दारे शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण व रक्त चाचणी करुन रक्तातील विविध घटकांचे प्रमाण तपासणेत आले. तसेच मधुमेह, रक्तदाब, तसेच रक्ताचे नमुने घेवून विविध आजाराची तपासणी करणेत येणार आहे. तसेच ऐनवेळी उद्भवणा-या आजारांकरीता देखील न.प. रुग्णालय सदैव उपलब्ध असेल असे आश्वासित करणेत आले. सदर शिबिराव्दारे करोना योध्दांच्या आत्मविश्वास उंचावण्यात मदत झाली असुन सर्व कर्मचारी अविरतपणे सेवा बजाविण्यास सक्षम असल्याचे सिद्ध होते.
सदर शिबिरास मुख्याधिकारी श्री.अविनाश गांगोडे, न.प. रुग्णालय वैद्दकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत बारेला, डॉ.सिध्दार्थ साळुंखे, स्वच्छता निरीक्षक श्री.व्हि.के.पाटील,कार्यालय निरीक्षक श्री.निलेश ठाकूर, कार्यालय अधिक्षक श्री.आर.एन.जाधव, अति.स्वच्छता पर्यवेक्षक श्री.प्रविण एस. मराठे, सिटी कोऑर्डिनेटर श्री.शुभम पाटील, स्वच्छता विभाग लिपीक श्री.रमेश पी. बाविस्कर आदी उपस्थित होते. सदर शिबिर मार्गदर्शन न.प. नाट्यगृह येथे आयोजित केले असुन कार्यक्रमाच्या वेळी सामाजिक अंतराचे सक्तीने पालन करणेत आले. तसेच सर्व उपस्थित व्यक्तींनी मास्कचा वापर केला. सदर परिसर कार्यक्रमा आधी व नंतर सोडिअम हायपोक्लोराइड या जंतूनाशकाने सॅनिटाईझ करणेत आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More