आमदार लताताई सोनवणे यांचा प्रयत्नांनी उपजिल्हा रुग्णालयात वाढीव 50 बेड ची व्यवस्था करण्यात आली

चोपडा (प्रतिनिधी):- चोपडा तालुक्याचे आमदार सौ लताताई चंद्रकांतजी सोनवणे यांनी चोपडा विधानसभा मतदारसंघात कोविड 19 या विषाणूचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होत असल्याने रुग्णालयात येणार्या संक्रमित रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने उपलब्ध बेड अपुर्ण पडत आहे त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याने दि.04/07/2020रोजी माननीय नामदार श्री.गुलाबराव जी पाटील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव व जिल्हाधिकारी साहेब यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयासाठी सर्व सुविधा युक्त 50 बेड मिळणेबाबत पत्रव्यवहार केला होता तरी आज रोजी 50 बेड चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आलेत बेडची पाहणी करतांना आमदार सौ लताताई चंद्रकांतजी सोनवणे तहसीलदार अनिल गावित साहेब,डाॅ.मनोज पाटील , शिवसेना जिल्हा महिला प्रमुख रोहिणीताई पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र पाटील ,माजी उपसभापती प स एम व्ही पाटील सर पं स सदस्य भरत भाऊ बावीसकर, सुकलाल भाऊ कोळी तालुका संघटक दिपक चौधरी युवा सेना उपजिल्हा प्रमुख,रमेश पाटील माजी पं स सदस्य बबलु पावरा व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More