बचत गटाच्या वतीने सावित्रीआई फुले जयंती उत्साहात साजरी चोपडा

बचत गटाच्या वतीने सावित्रीआई फुले जयंती उत्साहात साजरी चोपडा

प्रतिनिधी(सचिन जैस्वाल)
चोपडा तालुक्यातील लासूर येथे दि.3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने लासुर येथे सोनल माता तसेच श्री दत्त महिला बचतगट यांचा वतीने आदिवासी भागात सावित्रीबाई फुले यांचे महत्त्व तसेच स्त्री शिक्षणचे महत्त्व कळावे म्हणून आदिवासी परिसरात सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.

सहयोगिनी सौ वैशाली पाटील यांनी सांगितले की आपल्या आदिवासी गटातील महिलाना आपली सही सुध्दा करता येत नसून नेहमी सर्व अंगठा देतात म्हणून शिक्षणाचे महत्व कळावे या साठी 3 जानेवारी भारतातील पहिली प्राध्यापिका व महिला शिक्षनाचे खरा वारसा यांचा जयंती निमित्त प्रत्येक महिलेला एक पाटी व पेन्सिल पुडा वाटप करण्यात आले त्या प्रसंगी सह्योगिनी ताईसौ वैशाली पाटील ,मनीषा सैंदाणे व सुनिता माळी यांनी वाटप केले तसेच कार्यक्रमाला उपस्थित व्ही एल सी च्या माजी अध्यक्ष अंजुम पिंजारी व गाव प्रतिनिधी नंदा पाटील यादेखील उपस्थित होत्या सर्वांना कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करून श्री शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More