चोपडा नगरपरिषदेच्या विविध समित्या गठीत करण्यासाठी आँनलाईन आढावा  बैठक संपन्न

चोपडा नगरपरिषदेच्या विविध समित्या गठीत करण्यासाठी आँनलाईन आढावा  बैठक
    चोपडा (प्रतिनिधी)सचिन जैस्वाल       जिल्हाधिकारी जळगांव यांचेकडिल आदेश क्रमांक/पालिका/3/कावि/295/2020, दि.29/12/2020 विशेष सभेची सुचना क्रमांक/पालिका-3/कावि/295/2020, दि.29/12/2020 अनुसार महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 चे कलम 63 व त्यातील दिनांक 13 डिसेंबर, 2006 ची सुधारणा तसेच महाराष्ट्र नगरपालिका (विषय समितीची निवडणूक) नियम, 1966 मधील तरतुदीनुसार स्थायी समिती व विषय समित्यांच्या सदस्यांचे नामनिर्देशन करणेसाठी मंगळवार दि.05/01/2021 रोजी सकाळी 11-00 वाजता जिल्हाधिकारी, जळगांव यांचे प्रतिनिधी पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार चोपडा.छगन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली  चोपडा नगरपरिषदेच्या  छत्रपती शिवाजी महाराज  सभागृहात व्हिडिओ काँन्फरन्सद्वारे आयोजित सभेस अध्यक्षा सौ.मनिषा जीवन चौधरी, गटनेता  चोपडा विकास मंच.जीवन ओंकार चौधरी  तसेच शिवसेना गटनेता महेश बाबुराव पवार, मुख्याधिकारी.अविनाश गांगोडे यांचेसह २४  नगरसेवकआँनलाईन सभेस उपस्थित होते. पिठासीन अधिकारी, यांनी प्रस्तुत विशेष सभेस उक्त नमुदपणे गणपुर्ती झाल्याने विशेष सभा कामकाज सुरु करण्याचे निर्देश दिले व त्याअनुषंगाने विषय सुचीनुसार सभा कामकाजास सुरुवात झाली.  तद्नंतर दोन्ही गट नेत्यांनी स्थायी समिती व विषय समित्यांच्या सदस्यांचे नामनिर्देशन करणेकामी प्रस्ताव पिठासीन अधिकारी यांचेकडेस सादर केले.  त्यानुसार पुढील प्रमाणे स्थायी समिती व विषय समिती निहाय सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम समितीसाठी, चोपडा विकास मंच तर्फे रमेश शिंदे, जिवन चौधरी, हितेंद्र देशमुख, हुसेनखा पठाण, अशोक बाविस्कर, कैलास सोनवणे, नसिमबाना जहागिरदार व शिवसेना गटाकडून किशोर चौधरी, मनिषा जैस्वाल, शिक्षण समिती व विद्दयुत समितीसाठी चोपडा विकास मंच तर्फे काजी रुखसाना, सिमा श्रावगी, सरला शिरसाठ, सुरेखा माळी, राजेंद्र गुजर, कृष्णा पवार, नसिमबानो जहागिरदार व शिवसेना गटातर्फे किशोर चौधरी, मनिषा जैस्वाल, स्वच्छता, वैद्दक व सार्वजनिक आरोग्य समितीसाठी चोपडा विकास मंच तर्फे सुप्रिया सनेर, जिवन चौधरी, नारायण बोरोले, कैलास सोनवणे, कृष्णा पवार, सिमा श्रावगी, नुरअफजाबेगम सैय्यद व शिवसेना गटातर्फे मनिषा जैस्वाल, किशोर चौधरी, पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समितीसाठी चोपडा विकास मंच तर्फे गजेंद्र जायसवाल, जिवन चौधरी, नारायण बोरोले, अशोक बाविस्कर, शोभाबाई देशमुख, विमलबाई साळुंखे, काजी रुखसाना सैय्यद व शिवसेना गटातर्फे किशोर चौधरी, लताबाई पाटील, महिला व बालकल्याण समितीसाठी चोपडा विकास मंच तर्फे दिपाली चौधरी, शोभाबाई देशमुख, सरला शिरसाठ, सुरेखा माळी, कृष्णा पवार, विमलबाई साळुंखे, नुरअफजाबेगम सैय्यद व शिवसेना गटातर्फे मनिषा जैस्वाल, लताबाई पाटील, नियोजन विकास समितीसाठी चोपडा विकास मंच तर्फे भुपेंद्र गुजराथी, जिवन चौधरी, अशोक बाविस्कर, नारायण बोरोले, कैलास सोनवणे, विमलबाई साळुंखे, नसिमबानो जहागिरदार व शिवसेना गटातर्फे किशोर चौधरी, महेश पवार तसेच स्थायी समितीसाठी चोपडा विकास मंच तर्फे हितेंद्र देशमुख, हुसेनखा पठाण व शिवसेना गटातर्फे महेश पवार, उक्त सर्व सदस्य नगरपरिषद चोपडा यांचेे स्थायी समिती व विषय समिती निहाय नामनिर्देशन करणेत आले. तसेच नगरपरिषद अध्यक्ष हे स्थायी समितीचे सभापती असतील व उपाध्यक्ष हे नियोजन व विकास समितीचे पदसिध्द  सभापती असतील असे घोषीत करुन  सभेचे कामकाज संपल्याचे पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार, चोपडा यांनी सकाळी 11-30 वाजता जाहिर केले व सर्व उपस्थित सदस्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More