पारंपारिक लोककला जपणे, जोपासणे आपले कर्तव्य -श्रीकांत नेवे बहुरूपी लोककलावंताचा चोपडा येथे सन्मान

पारंपारिक लोककला जपणे, जोपासणे आपले कर्तव्य -श्रीकांत नेवे
बहुरूपी लोककलावंताचा चोपडा येथे सन्मान

चोपडा- टेलिव्हिजन, संगणक आणि मोबाईलच्या आधुनिक युगात ‘बहुरुपी’ पारंपरिक लोककला लोप पावत चालली आहे. तिचे जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. नव्हे तर ती आपली सामूहिक जबाबदारी आहे. ही पारंपरिक कला जिवंत ठेवण्याचे आकाशजी बहुरूपीया (जयपूर) यांचे कार्य उल्लेखनीय आहे. समाजात हल्लीच्या काळात अश्या लोककलाची पाहिजे तशी दखल घेतली जात नाही अशी खंत आहे.पण राजदरबारी ज्या कलेला वेगळे महत्व होते.त्या कलेची आज अत्यंत बिकट अवस्था आहे.तरीही गेले तीन चार पिढ्या चोपडा शहरात श्री.आकाश यांचे वाडवडील आपला छंद जोपासत आहेत हे खुप आनंददायी आहे.असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार श्रीकांत नेवे यांनी केले.
यावेळी नेवे पुढे म्हणाले की,बहुरूपी ही भारतात प्राचीन काळापासून चालत आलेल्या लोककला पैकी एक श्रेष्ठ कला आहे. मनोरंजना सोबतच आपल्या गौरवशाली इतिहासाची ओळख व स्मरण करने तसेच समाजातील अनिष्ट प्रथा विरुद्ध आवाज उठविण्याचे काम हे बहुरूपी कलावंत करत असतात. मुळचे जयपूर येथील आकाशराज बहुरूपीया हे दरवर्षी चोपडा येथे येत असतात. बहुरूपी हे त्यांचे पारंपरिक काम असून गेल्या अनेक पिढ्या पासून सुरू आहे. सद्ध्या ते चोपड्यात असुन गेल्या दहा दिवसापासून चोपडे शहरात आपली कला सादर करीत आहेत. राम, हनुमान, रावण, शंकरजी या सारखे पौराणिक पात्र तसेच डाकू गब्बरसिंग, जोकर, पोलीस इन्स्पेक्टर, जीन, दूधवाली बाई असे सिनेमातील गाजलेले पत्र या विविध भूमिका साकारली आहेत .
मनोरंजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे जयपूर येथील बहुरूपी कलावंत आकाशराज बहुरूपी यांचा स्वामी विवेकानंद युवा फाऊंडेशन मार्फत सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

स्वामी विवेकानंद युवा फाऊंडेशन चोपडा यांनी उपेक्षित असलेल्या या लोककलावंताचा यथोचित गौरव केला त्याबद्दल दत्तात्रय धनगर यांनी समाधान व्यक्त केले. फाऊंडेशन च्या कामाचे कौतुक केले.
याप्रसंगी स्वामी विवेकानंद युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र शिंपी, धुळे येथील कृषीधिकारी उमाकांत पाटील , तसेच सदस्य राधेश्याम पाटील ,किशोर मराठे, राजेंद्र सोनार, चेतन देशमुख, मुकेश मराठे, साहिल सोनार हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More