शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

चोपडा येथील मल्हारपुरा भागात शिवजन्मोत्सव समिती व जय भवानी मंडळ, मल्हारपुरा यांच्यातर्फे शिवजयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासकीय आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन मल्हारपुरा परिसरातील तरुणांनी एकत्र येऊन यावर्षी शिवजयंती निमित्ताने निघणारी मिरवणूक रद्द करून त्याऐवजी रक्ताच्या गरजेला प्राधान्य देऊन इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित आसकरण ताराचंद जैन रक्तपेढी च्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रथम प्रा. डी बी देशमुख, डॉ. सुरेश पाटील, गिरीष आप्पा पाटील, रमेश शिंदे, प्रमोद पाटील, सुनील पाटील, दीपक पाटील, महेंद्र पाटील, प्रा. डॉ. शैलेश वाघ, भटू पाटील, नरेंद्र बाविस्कर, हिरालाल माळी व अनेक मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवराय व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

सदर रक्तदान शिबिरात चाळीसपेक्षा अधिक स्त्री व पुरुष यांनी रक्तदान केले. रक्तपेढी च्या माध्यमातून प्रत्येक रक्तदात्यास एक लाखाचे विमा संरक्षण यानिमित्ताने देण्यात आले. रक्तदान शिबिराला नगरपरिषद गटनेते जीवन चौधरी शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील नगरसेवक किशोर चौधरी व मान्यवरांनी भेट दिली. नवीन समाजोपयोगी उपक्रम राबविल्याने परिसरातील नागरिकांनी आयोजक तरुणांचे अभिनंदन केले. रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मयूर पाटील, रोहन वाघ, खिलेश पाटील, मनीष शिंदे, सोहन पाटील, रुपेश पाटील, सौरभ पाटील, विजय माळी, मनीष पाटील, मोहित पाटील, किर्तीराज पाटील, भावेश पाटील, कपिल वाघ, भूषण महाजन यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More