विद्यार्थिनींनी रांगोळ्यांमधून दिला मतदार जागृतीचा संदेश

विद्यार्थिनींनी रांगोळ्यांमधून दिला मतदार जागृतीचा संदेश

चोपडा – पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. या जागृती अभियाना अंतर्गत येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

           चोपडा विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अनिल गावित व विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी यांनी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. गटशिक्षणाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी डॉ. भावना भोसले, तालुका समन्वयक तथा नोडल अधिकारी युवराज पाटील यांनी यावेळी भेट देऊन विद्यार्थिनींचे कौतुक केले. स्पर्धेच्या आयोजनासाठी कलाशिक्षक व्हीं. डी. पाटील यांनी परिश्रम घेतले. उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी शाळेच्या विविध उपक्रमांचे यावेळी कौतुक केले.

मोठा गट :

प्रथम – राजनंदिनी चौधरी (प्रताप विद्या मंदिर), द्वितीय – अश्विनी पाटील (क.शा. वा. महाविद्यालय), तृतीय – दिपाली पाटील (क. शा. वा. महाविद्यालय)

       शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील सुमारे ४० विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. मतदार जागृतीचा संदेश देणाऱ्या आकर्षक रांगोळ्या यावेळी विद्यार्थिनींनी महिला मंडळ शाळेच्या सांस्कृतिक सभागृहात रेखाटल्या होत्या. रांगोळी स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे :

लहान गट :

प्रथम – विशाखा प्रताप निकुंभे (महिला मंडळ माध्य विद्यालय), द्वितीय – ऋचा दिनेश दण्डवते (विवेकानंद विद्यालय), तृतीय – गरिमा श्रावण चौधरी (विवेकानंद विद्यालय)

      विजेत्या विद्यार्थिनींना लवकरच विशेष समारंभात गौरवित केले जाणार आहे.

फोटो – महिला मंडळ माध्यमिक विद्यालयातील रांगोळी स्पर्धेची पाहाणी करतांना उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, तहसीलदार अनिल गावित, गटशिक्षणधिकारी डॉ. भावना भोसले, समन्वयक युवराज पाटील, मुख्याध्यापक सुनील चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More