अवैध वाळू वाहतुकीला आळा घाला
घाडवेल ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन

अवैध वाळू वाहतुकीला आळा घाला
घाडवेल ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
चोपडा प्रतिनिधी :—–
चोपडा तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीने कळस गाठला आहे तसेच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची मुजोरी देखील वाढली आहे . शासकीय कर्मचाऱ्यांना दमदाटी करणे , मारणे इत्यादी प्रकार सर्रास घडत आहेत तसेच मागील महिन्यात चहार्डी – घाडवेल रस्त्यालगत असलेल्या महावितरणच्या डीपीला अवैध वाळू चोरी करणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली होती त्या ट्रॅक्टरवर संपूर्ण डीपी कोसळल्याने ट्रॅक्टर ने पेट घेतला होता व त्यात चालक गंभीररीत्या भाजला गेला होता अशा अनेक घटना तालुक्यात सातत्याने घडत असताना देखील अवैध वाळू वाहतुकीवर प्रशासनाच्या अंकुश मात्र दिसून येत नाही ,ही विचार करायला लावणारी बाब आहे .


चोपडा तालुक्यातील घाडवेल तापी नदीपात्रातून राजरोस अवैध वाळू वाहतूक होत असल्याच्या तक्रारी व निवेदने ग्रामस्थांनी वारंवार तहसीलदार यांना दिली आहेत पण आतापर्यंत मात्र कारवाई शून्य दिसून आली आहे याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .


तापी नदीपात्रातून रात्री-अपरात्री दिवसा मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सर्रासपणे चालू आहे .मुजोर वाळू चोर ट्रॅक्टर्स वेगाने तर चालवतात पण रस्त्यावरील पायी चालणारे ,बैलगाडी , मोटार सायकलस्वारांना कट मारतात .सदर बाबतीत जर कोणी त्यांना जाब विचारला तर ते धमकी देतात ,शिवीगाळ करतात , ट्रॅक्टरखाली चिरडून टाकू , मारून टाकू , आमचे कोणीच काही करू शकत नाही असे उर्मटपणे बोलतात अशा आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी तालुक्याचे तहसीलदार अनिल गावित यांना दिले आहे व अवैध वाळू चोरी करणाऱ्या संबंधितांच्या कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे .
सदर निवेदनावर हुकुम भिला पाटील , चंद्रकांत शिवाजी पाटील ,समाधान डोंगर पाटील ,विजय साहेबराव पाटील ,गजानन योगराज पाटील , केदारनाथ गंगाराम पाटील , दिपक देवीदास पाटील यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More