चोपड्यात रेमडीसीवर इंजेक्शनबाबत रुग्णांचा नातेवाईकात असंतोष
रुग्णांचा जीव धोक्यात , नातेवाईकांची इंजेक्शनसाठी भटकंती

चोपड्यात रेमडीसीवर इंजेक्शनबाबत रुग्णांचा नातेवाईकात असंतोष
रुग्णांचा जीव धोक्यात , नातेवाईकांची इंजेक्शनसाठी भटकंती

चोपडा प्रतिनिधी :—–
तालुक्यात गेल्या आठवड्याभरात रेमडीसीवर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असून ,कृत्रिम टंचाई निर्माण करून रुग्णांची आर्थिक लुबाडणूक सुरू आहे . इंजेक्शन अभावी कोविड संसर्ग झालेल्या गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे . रेमडीसीवर इंजेक्शनसाठी रुग्णांचे संबंधित नातेवाईक डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन घेऊन शहरात गल्लोगल्ली फिरताना दिसत आहेत .एक हजार रुपये किमतीचे इंजेक्शन बाराशे ते तीन हजार रुपये पर्यंत काळ्याबाजारात सर्रास विक्री होताना दिसत आहे . इंजेक्शनचा कथित काळाबाजार रोखण्यासाठी तात्काळ प्रशासनामार्फत चौकशी होऊन संबंधित औषधे विक्रेत्यांवर कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी कोविंड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे .


रेमडीसीवर इंजेक्शन चोपडा तालुक्यात मिळता – मिळेना अशी भयंकर अवस्था झालेली असताना रुग्णांचे नातेवाईक मात्र शहरातील सर्व मेडिकल स्टोअर्सवर दरदर भटकंती करताना दिसून येत आहेत .काही रुग्णांना दोन डोस तर काहींना चार डोस अपूर्ण असून रेमडीसीवर मिळविण्यासाठी नातेवाईक जीवाचे रान करीत आहेत .


चोपडा तालुक्यातील कृष्णापूर येथील महेंद्र शिरसाठ हा रुग्णांचा नातेवाईक रेमडीसीवर घेण्यासाठी मेडिकल स्टोअर्सवर गेला असता त्याला रेमडीसीवर इंजेक्शनची किंमत 3000 रुपये सांगण्यात आली पण महेंद्र शिरसाठ यांच्या खिशात फक्त रुपये 2000 होते , त्यांनी मेडिकल चालकाच्या खूप विनवण्या केल्या की उर्वरित हजार रुपये मी तुम्हाला नंतर आणून देईल कृपया मला इंजेक्शन द्या , त्यासाठी ते अक्षरशः रडले सुद्धा पण त्यांना रुपये 2000 त रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले नाही ही खूप मोठी शोकांतिका ठरली आहे .
उपजिल्हा रुग्णालयासह खाजगी हॉस्पिटलमध्ये कोविडचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत पण रेमडीसीवर उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यासह नातेवाईकांना खूप काळजी वाटायला लागली आहे .
गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून शहरात व ग्रामीण भागात कोरोनाच्या दुसऱ्या नवीनच स्ट्रेंथची धोकेदायक लाट आली असून त्यामुळे मार्च महिन्यात 300 पेक्षा जास्त रुग्ण दररोज आढळून येत होते त्यामुळे फक्त मार्च महिन्यात जवळपास सात हजार कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते तर जवळपास साठ रुग्णांचा मृत्यू झाला होता .

रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे .दररोज रुग्णांचा मृत्यू होत आहे ही वस्तुस्थिती असून त्याचे वास्तव व विदारक चित्र तालुक्यात निर्माण झाले असताना रेमडीसीवर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणे कितपत योग्य आहे .
दुसऱ्या लाटेतील नवीनच स्ट्रेंथच्या विषाणूमुळे चोपडा तालुक्‍यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत भरमसाठ वाढ झाल्याने शहरातील उपजिल्हा रुग्णालयाचे कोविड हेल्थ सेंटर ,महाविद्यालयाचे कोविड केअर सेंटर व शहरातील सहा खाजगी कोविड सेंटर हाऊसफुल्ल झाले आहेत . शहरात कोणत्याच हॉस्पिटलला बेड उपलब्ध होत नाहीत एवढी गंभीर व विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यात शहरात रेमडीसीवर इंजेक्शनची कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार सुरू आहे .इंजेक्शन अभावी कोविड संसर्ग झालेल्या गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे . रेमडीसीवर इंजेक्शनसाठी रुग्णांचे संबंधित नातेवाईक डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन घेऊन शहरात गल्लोगल्ली फिरताना दिसत आहेत .एक हजार रुपये किमतीचे इंजेक्शन 1200 रुपये ते 3000 रुपयांपर्यंत विक्री होताना दिसत आहे .त्यामुळे अडचणीत सापडलेल्या रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे . शहरात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना कोणत्याच औषधी दुकानावर रेमडीसीवर इंजेक्‍शन मिळत नाही .शेवटी नातेवाईकांचे वरिष्ठांना , पदाधिकाऱ्यांना फोन करून किंवा सर्वत्र प्रयत्न संपल्याने इंजेक्शन आणायचे कुठून असा प्रश्न निर्माण होत आहे .कोविडचे गंभीर रुग्ण रामभरोसे असून त्यांचे बरे-वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल रुग्णांच्या कुटुंबीयांकडून उपस्थित होत आहे
रेमडीसीवर इंजेक्शनची काळ्याबाजारात होणार्‍या बेकायदेशीर विक्रीची प्रशासनाकडून तात्काळ चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी असे सुज्ञ नागरिकांकडून मागणी होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More