वर्डी येथील शेतकरी हळदीच्या पिकाचा माध्यमातून जोपासतोय सामाजिक बांधिलकी

वर्डी येथील शेतकरी हळदीच्या पिकाचा माध्यमातून जोपासतोय सामाजिक बांधिलकी
चोपडा प्रतिनिधी :——-


कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य चोखपणे बजावत असणारे पोलीस प्रशासनातील अधिकारी – कर्मचारी , डॉक्टर्स , नर्सेस , हे आपली ड्युटी वेळेचे भान विसरून करत आहेत याची जाण ठेऊन तालुक्यातील वर्डी येथील प्रयोगशील शेतकरी व सामाजिक कार्य करणारे शिक्षक मोहन चव्हाण ह्यांनी आपल्या शेततातील स्वतः उत्पादित केलेली ओली हळद शिवाजी चौकात कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांना प्रत्येकी एक किलो ओली हळदीचे वाटप केले . या ओली हळदिचे आयुर्वेदात फार महत्त्व आहे .


इम्मुनिटी बूस्टर म्हणून ओली हळदीचे महत्व आहे .या हळदी पासून लोणचं, ठेचा,भाजी,दुधात अद्रकसारखे टाकतात . केमिकल विरहीत हळद पोटात जात असल्याने इम्मुनिटी पॉवर वाढविण्यास लवकर गुण मिळत असल्याचे त्यांनी सांगितले .


मोहन चव्हाण हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात .प्रयोगशिल शेतकरी म्हणून त्यांना ओळखले जाते. शेतीत नवनवीन प्रयोग करणे ,गावातील पाणी अडवा – पाणी जिरवा, कोरोना काळात घरोघरी अँटीजन टेस्ट, लसीकरणं करण्यासाठी जनजागृती करणे, उत्तम सूत्रसंचालक म्हणून त्याची ओळख आहे . वर्डी गावात काही नवीन झाले तर ते सोशल मीडिया द्वारे संपुर्ण जगात पोचविण्याचे काम मोहन चव्हाण करत असतात .वर्डी गावात अटीजन टेस्ट साठी आलेल्या अडावद येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर,नर्स यांना ही तसेच चोपडा शहरातील पत्रकारानां ही ओली हळद दिली व वर्डी गावात सेवा देण्यासाठी येणाऱ्या आशा वर्करच्या महिलांना ही हळद देणार असल्याचे मोहन चव्हाण यांनी सांगितले.
कोरोनाचा काळात बाजारपेठ बंद असल्याने शेतकरी मनोज चव्हाण यांनी आपल्याच वाहनातून थेट गिऱ्हाईकांपर्यंत माल उपलब्ध करून दिला आहे .बाजारभाव प्रति क्विंटल ८ ते ९ हजार आहे पण थेट गिऱ्हाईकांना फक्त ४० रुपये किलो दराने उपलब्ध करून दिल्याने गिऱ्हाईकांनी उत्तम प्रतिसाद दिला .


शेतकरी मोहन चव्हाण कोरोना योध्दाना हळदी मोफत वाटप करीत असल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More