कायदा फक्त सर्व सामान्यांसाठी , अधिकाऱ्यांसाठी नाही का ?
व्यापारी महामंडळाचा सवाल

कायदा फक्त सर्व सामान्यांसाठी , अधिकाऱ्यांसाठी नाही का ?
व्यापारी महामंडळाचा सवाल …
चोपडा प्रतिनिधी :—–
गेल्या दोन दिवसांपासून चोपडे शहरात चोपडा नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची दरोडेखोरांप्रमाणे दादागिरी चालू आहे व त्याला महाराष्ट्रात तोड नाही असा घणाघाती आरोप व्यापारी महामंडळाने केला आहे .


सर्व सामान्य लोकांना त्रास देणे आणि कोणत्याही दुकानावर जाऊन पोलीस व नगरपालिकाचे कर्मचार्‍यांचे ५० ते ६० लोकांचा ताफा सोशल डिस्टन्सचे वापर न करता गुंडगिरी प्रमाणे दुकानदारांना फक्त त्रास देणे हाच एकमेव उद्देश ठेवून त्यांना आर्थिक व मानसिक त्रास देणे हा प्रकार सध्या सुरू असल्याचा आरोप व्यापारी महामंडळाने केला आहे .
जे काही अधिकारी व कर्मचारी कारवाईचा बडगा करीत आहेत त्यांचे सर्वांचे पगार लॉकडाउन मध्ये पण सुरूच असून फक्त व्यापारी वर्गाचा वर्षभरापासून पगार बंद आहे याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे म्हणणे आहे .


व्यापाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे दादागिरी सुरू आहे का? असाही सवाल व्यापारी महामंडळाने उपस्थित केला आहे . बंद असलेले दुकानाचे कुलूप उघडायला लावून व झुंडशाहीचा दबाव टाकून जबरीने पाच ते दहा हजार रुपयांचा दंड ठोठावल्याचा प्रकार सुरू असल्याचे म्हणणे आहे . गरीब बिचाऱ्या व्यापाऱ्यांना त्रास देण्यापेक्षा अधिकाऱ्यांची जे हप्ते वसुली व टक्केवारी सुरू आहे ,याचा वर नियंत्रण कोण ठेवणार असा सवाल व आरोप महामंडळाने केलेला आहे.
हा सर्व प्रकार सामान्य माणसाकडून मोबाईलमध्ये चित्रीकरण करत असताना पोलिसांकडून त्यालाही मारहाण करण्यात आली असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वसामान्य माणसांकडून पोलिसांची दादागिरीने वसुली सुरू आहे , असा त्रास इतर कोणतेही चौकात नाही असा रोश सर्वसामान्य जनतेचा असल्याचे म्हणणे आहे . या संदर्भात माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री गुलाबराव पाटील , गृहमंत्री दिलीप वळसे पाटील , चोपड्याच्या आमदार सौ लताताई सोनवणे , जिल्हाधिकारी अभिजित राऊत , जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्याकडे सोशल मीडियाद्वारे व्यापारी महामंडळ ने तक्रार पाठवलेली असल्याचे सांगितले .


व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृतराज सचदेव ,अनिल वानखेडे , भवरलाल जैन ,संजय कानडे , सुनील बरडिया , संजय श्रावणी , बोहरी , सुनील राखेचा यांसह शेकडो व्यापाऱ्यांनी तक्रारीद्वारे सहकार्याची मागणी केलेली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More