“पी एम किसान योजनेचे पोर्टल लवकर सुरू करण्यात यावे रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटनेची मागणी

“पी एम किसान योजनेचे पोर्टल लवकर सुरू करण्यात यावे रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटनेची मागणी

पी.एम. किसान योजने ‘पासून जळगाव जिल्हाच चे शेतकरी वंचित
किसान सन्मान निधीबाबत सरकार निधी पाठवत आहे. स्थानिक स्तरावर प्रशासन याबाबत जागरूकपणे शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी काम करीत नसल्याची स्थिती आहे. जळगाव जिल्ह्यातील पी. एम. किसान निधी चे पोर्टल बऱ्याच दिवसापासून बंद आहे व ते का बंद आहे याला कारण काय यापासून बरेच शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे तरी लवकरात लवकर पोर्टल चालू करावे
शेतकऱ्यांचे अकाउंट नंबर नाव दुरुस्ती आधार कार्ड नंबर दुरूस्ती होत नाही

यामुळे जिल्ह्यात बरेच शेतकरी या निधीच्या लाभापासून वंचित आहेत.
: केंद्र सरकारच्या पी. एम. किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर चुकीची आहेत. आधार कार्डशी या नावांचा मेळ बसत नसल्याने ही नावे दुरुस्त करावयाची आहेत. मात्र, ही दुरुस्तीची कार्यवाही ग्रामीण भागात अजूनही झालेली नाही. महसूल विभाग व कृषी विभागाच्या उदासीनतेमुळे शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. त्या अगोदर याद्या दुरुस्त करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले होते. केंद्र सरकारने पोर्टलवर दुरुस्तीसंबंधी शेतकऱ्यांच्या नावांची यादी जिल्हा प्रशासनाने तलाठ्यांकडे पाठविली होती. यासंदर्भातील नावांची दुरुस्ती, आधारबाबतची खात्री करून घ्यावयाची होती. काही ठिकाणी केवळ स्थानिक राजकारण, कामचुकारपणा यातून या याद्या शेतकऱ्यांना दाखविल्याच गेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले नाव या यादीत दुरुस्तीसाठी आले होते का? याची माहिती अनेक भागांत झालेली नसल्याचे कळाले. किसान सन्मान निधीबाबत सरकार निधी पाठवत आहे. स्थानिक स्तरावर प्रशासन याबाबत जागरूकपणे शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी काम करीत नसल्याची स्थिती आहे. यामुळे जिल्ह्यात बरेच शेतकरी या निधीच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून यासंदर्भात तक्रारी वाढल्याने प्रशासनाने मध्यंतरी आढावा घेतला. त्यात शेतकऱ्यांची नावे, आधार क्रमांक याचा मेळ बसत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर याबाबतची दुरुस्ती करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले. हे आदेश देताना तलाठ्यांवर जबाबदारी निश्‍चित केली होती.
तरी लवकरात लवकर जळगाव जिल्ह्यातील पी एम किसान पोर्टल सुरु करावे अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More