खळबळजनक : चोपड्यात ऑनर किलिंगमधून दोघांचा खून;# चोपड्यातील वराड रस्त्यावर प्रेम प्रकरणातून सख्या भावाने बहिणीची गळा आवळून तर, तिच्या प्रियकराची गोळी झाडून केली हत्या

खळबळजनक : चोपड्यात ऑनर
किलिंगमधून दोघांचा खून; चोपड्यातील वराड रस्त्यावर प्रेम प्रकरणातून सख्या भावाने बहिणीची गळा आवळून तर, तिच्या प्रियकराची गोळी झाडून केली हत्या

चोपडा प्रतिनिधी :—


चोपडा (प्रतिनिधी)
जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी घटना चोपड्यात घडली आहे. चोपड्यात ऑनर किलिंगमधून दोघांचा खून झाला असून त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला आहे.

राकेश संजय राजपूत
वर्षा समाधान कोळी


या संदर्भात अधिक असे की, चोपडा शहर पोलीस स्थानकात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा पिस्टल घेऊन पोलिसात हजर झाला आणि आपण दोघांचा खून केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी चोपडा लगत जुना वराड रोड शिवारात पाहणी केली असता नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान, पोलिसांनी दोन संशयित अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

तर दोघांचा शोध सुरु आहे. वर्षा समाधान कोळी (वय २०, रा. सुंदरगगढी, चोपडा) आणि राकेश संजय राजपूत (वय, २२, रा. रामपूरा चोपडा) अशी मयत युगलाची नावे आहेत. प्रेम संबंधातून खून झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी मयत मुलीचा अल्पवयीन भाऊच फिर्यादी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास सहा.पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले हे करीत आहेत…
सदर घटनेत चार आरोपी असून करण उर्फ कुणाल समाधान कोळी वय १७ वर्ष,तुषार कोळी, भरत संजय रायसिंग , निलेश समाधान कोळी अशी आरोपींची नावे आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More