चोपडा रोटरीला दहा पुरस्कार प्राप्त…पंकज बोरोले यांची दमदार कामगिरी

*चोपडा रोटरीला दहा पुरस्कार प्राप्त…* *पंकज बोरोले यांची दमदार कामगिरी*
चोपडा प्रतिनिधी :-


चोपडा रोटरीने सन २०२१ – २२ या काळात तब्बल ६२ उपक्रम / कार्यक्रम यशस्वीपणे राबवून दमदार कामगिरी केली आहे. रोटरी या सेवाभावी संस्थेतर्फे मिळणाऱ्या विविध श्रेणीतील १३ पुरस्कारांसाठी पंकज बोरोले यांनी नामांकन दाखल केले होते. १३ पैकी तब्बल १० वेगवेगळ्या श्रेणीतील पुरस्कारांनी चोपडा रोटरीचे सन २०२१ – २२ चे अध्यक्ष पंकज बोरोले यांना सन्मानित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम प्रसंगी त्यांच्या समवेत प्रविण मिस्त्री , भालचंद्र पवार उपस्थित होते.

विशेष बाब म्हणजे जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त पुरस्कार मिळविणारा चोपडा रोटरी हा क्लब असून तब्बल १० वेगवेगळ्या श्रेणीतील पुरस्कारांनी पंकज बोरोले यांना सन्मानित करण्यात आले आहे .त्यात युवकांसाठी उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार . उत्कृष्ट उद्योजकता विकास कार्यक्रमासाठी पुरस्कार. समाजसेवेसाठी सर्वोत्कृष्ट पुरस्कार. उत्कृष्ट कुटुंब कल्याण कार्यासाठी पुरस्कार. नैसर्गिक आपत्ती दरम्यान केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार. सर्वोत्तम रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी पुरस्कार.आदिवासींसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार. उत्कृष्ट जनसंपर्कासाठी पुरस्कार. समाजातील महिलांच्या उन्नतीसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार. रोटाकिड्स रोटरी प्रांतपालांचा विशेष कौतुक पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे.


सदर पुरस्कारांचे वितरण नाशिक येथे गव्हर्नर डॉ. आनंद झूनझुनवाला यांच्या हस्ते व माजी गव्हर्नर रमेश मेहेर , शब्बीर शाकीर , राजे संग्रामसिंग भोसले , राजीव शर्मा , डॉ राजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पंकज बोरोले , प्रविण मिस्त्री व भालचंद्र पवार यांनी स्विकारले.त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शैक्षणिक,सामाजिक , सांस्कृतिक , आरोग्य , क्रीडा अशा विविध प्रकारचे वर्षभरात तब्बल ६२ उपक्रम / कार्यक्रम राबविले .
विविध श्रेणीतील १० पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आल्याने पंकज बोरोले , प्रविण मिस्त्री ,भालचंद्र पवार व संपूर्ण टीमचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More