मजरेहोळ फाट्या जवळ मारुती व्हॅन व मोटारसायकलचा भीषण अपघात,दोन जागीच ठार तर सहा जखमी

मजरेहोळ फाट्या जवळ मारुती व्हॅन व मोटारसायकलचा भीषण अपघात,दोन जागीच ठार तर सहा जखमी


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी):-


चोपडयाहुन धुळ्याकडे जाणाऱ्या मारुती व्हॅन व मोटर सायकलमध्ये समोरासमोर मजरेहोळ फाट्याजवळ रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास झालेल्या गंभीर अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून यात एकूण सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.यात जखमींवर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


वाडीभोकर(धुळे) येथील सहा जण मारुती व्हॅनक्र एम एच १८-डब्ल्यू ७९८७ मधून घरी जात असताना चोपडा धरणगाव रस्त्यावरील मजरेहोळ फाट्याजवळ धरणगाव कडून चोपड्याकडे येणाऱ्या मोटरसायकल क्र एम एच १९- सी एल- ७२४१ ला झालेल्या अपघातात चोपडा शहरातील आझाद चौकामधील अफसर इरफान काझी (४५) व त्याचा शालगडी शेख अनिस शेख जहुर (वय४२) हे दोघे जागीच ठार झाले आहेत.


मारुती व्हॅनमधील अविनाश बोरसे,आकाश साळवे,सागर पानपाटील,वाहन चालक अजय मोरे,राहुल घोडे,दीपक धनले (सर्व रा वाडीभोकर,धुळे) हे जखमी झाले आहेत.अपघाताचे वृत्त कळताच चोसाकाचे व्हा चेअरमन शशिकांत देवरे,माजी नगरसेवक हुसेन पठाण,वेले येथील माजी उपसरपंच विनोद पाटील, मुन्ना साळुंखे यांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.तर डॉ नरेंद्र पाटील,डॉ सुरेश पाटील यांनी जखमींवर उपचार केला.


या अपघातात जखमी झालेले वाहन चालक अजय मगन मोरे याच्या डोळ्याला जबर मारहाण लागल्या मुळे त्यांना त्वरित पुढील उपचारासाठी धुळे येथे उपजिल्हा रुग्णालयतुन रवाना केले आहे.अपघात घडल्यानंतर पोलिसांनी व जखमींना मदत करणाऱ्या लोकांनी कागदपत्रे पाहून ओळख पटवली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More