महावितरण चाहलगर्जीपणा विजेच्या धक्क्याने कचरा वेचणाऱ्या महिलेचा मृत्यू…

महावितरणचा हलगर्जीपणा …विजेच्या धक्क्याने कचरा वेचणाऱ्या महिलेचा मृत्यू…


महाराष्ट्र9न्यूज चोपड़ा (प्रतिनिधी):-


प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यासाठी गेलेल्या ३४ वर्षीय महिलेला विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यांतील अकुलखेडा शिवारात घडली आहे.


शहरातील यावल नाका परिसरातील शेतपूरा भागातील चांभारवाड्यातील रहिवाशी अनिता महेंद्र अहिरे (वय ३४) ही महिला नेहमी प्रमाणे प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यासाठी जुना शिरपूर रोडवरून जात असतांना अकुलखेडा शिवारातील जयेश हॉटेलच्या पाठीमागील भागात प्लॅस्टिक गोळा करीत असतांना अनावधानाने महिलेला विजेचा शॉक लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


दरम्यान जयेश हॉटलचे कर्मचारी पाठीमागे कामानिमित्त गेले असता त्यांना एक महिला पडलेली दिसली त्यानंतर त्यांनी घटनेची पोलिसांनी खबर दिली यावेळी तात्काळ खाजगी रुग्णवाहिका घटनास्थळी बोलावून अनिता महेंद्र अहिरे यांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले . यावेळी सीएमओ डॉ. तृप्ती पाटील यांनी त्यांची तपासणी करून सदर महिलेला मृत घोषित केले. याबाबत डॉ. तृप्ती पाटील यांच्या खबरीवरून शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


महावितरणाच्या तारा जमिनीपर्यंत खाली लोंबकडलेल्या आहेत आणि त्या तारांना सदर महिलेचा स्पर्श झाल्याने महिलेला शॉक लागला असावा व त्यानेच महिलेचा मृत्यू झाला असावा अशीच सर्वत्र चर्चा सुरू आहे.महावितरणाचे अभियंता महेश गांजोडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत, येत्या दोन दिवसात सदर तारा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More