चोपडा ग्रामीण पोलिसांची अवैध गावठी दारुची कारवाई…४३००० रू किमतीचे रसायन व दारू हस्तगत…

चोपडा ग्रामीण पोलिसांची अवैध गावठी दारुची कारवाई…४३००० रू किमतीचे रसायन व दारू हस्तगत…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-


चोपडा ग्रामीण पोलिसांनी अवैध गावठी दारू विरूद्ध कारवाईचा बडगा उगारला असून चोपडा ग्रामीण पो.स्टे. हद्दीतील उजाड कर्जाना, चौगांव, घोडगांव, मजरे हिंगोणा तसेच हातेड बु !! यागांवी अवैध गावठी हातभट्टी दारु विक्रेते तसेच दारु गाळणारे यांचेवर कारवाई करत उजाड कर्जाणा व चौगांव गांवी २४०० लिटर गावठी दारु गाळण्याचे कच्चे रसायन ३६०००/रुपये किमतीचे तसेच गावठी हात भट्टीची तयार दारु ११० लिटर ३४०० रु किमतीचे असे प्रोव्हीबिशन रेड करुन नष्ट करुन देशी विदेशी टॅगो ,पंच ,मॅग्डॉल रम, आय बी दारु रुपये ४४०० रुपयांची जप्त केली आहे. त्यात लासूर येथील बिअर शॉपी वर पण कारवाई केली असल्याचे समजते.


वरील कारवाईत आरोपी मोतीलाल पांडुरंग बाविस्कर वय ३९ रा हातेड बु , दिलीप श्रावण बाविस्कर वय ६१ रा लासुर ,शरद रमेश कोळी वय ३८ रा घोडगांव ,संजय रामचद्र बारेला वय २५ रा उजाड कर्जाणा , प्रदिप सुरेश ढिवरे वय ३२ रा चौगाव ता चोपडा यांचे विरुध्द चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला प्रोव्हीबिशन सदरा खाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


सदर कारवाई सहा. पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले चोपडा भाग चोपडा यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप दुनगहु, पो .उप निरी अमरसिंग वसावे ,पोहेकॉ शिवाजी बाविस्कर, पो.हे.कॉ. संजय येदे, पो.ना. शशिकांत पारधी, पो ना . किरण पाटील ,पोहेकॉ पल्लवी वाणी, पोना राकेश पाटील ,पो ना निता राजपुत, पोकॉ सुनिल कोळी आदींनी कारवाई केली आहे…
सदर कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More