सहाय्यक निबंधक यांची पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ… अरेरावीची भाषा…# तापी सहकारी सूतगिरणी निवडणूक प्रकरण…

सहाय्यक निबंधक यांची पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ… अरेरावीची भाषा…# तापी सहकारी सूतगिरणी निवडणूक प्रकरण…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-


चोपडा तापी सहकारी सूतगिरणीची व्यवस्थापन समितीची पंचवार्षिक निवडणूक सन २०२२ ते २०२७ साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून दि. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजे पर्यंत माघारीची मुदत होती व दि. २४ नोव्हेंबर रोजी उमेदवारांना निशाणी ( चिन्ह ) वाटप व अंतिम यादीचे प्रकाशन कार्यक्रम होता.


सदर निवडणूक प्रक्रिया संदर्भातील अंतिम यादी घेण्यासाठी पत्रकार निवडणूक निर्णय अधिकारी एस एफ गायकवाड यांच्याकडे गेले असता व सदर निवडणूक प्रक्रियेतील अंतिम यादीची मागणी केली असता त्यांनी सदर माहिती देण्यास टाळाटाळ केली व पत्रकारांना अरेरावीची भाषा करत सदर याद्या बाहेर लावलेल्या आहेत ,त्याच्या फोटो तुम्ही काढू शकता ? मी तुम्हाला झेरॉक्स प्रत देऊ शकत नाही. मला तुम्हाला माहिती द्यायला वेळ नाही आणि पत्रकारांना माहिती देणे हे बंधनकारक नाही व सहकार कायद्यात देखील नाही असे सांगत पत्रकारांशी हुज्जत घालत माहिती देण्यास टाळाटाळ केली..


सदर घटना काही उमेदवारांच्या कानावर गेली असता त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी एस एफ गायकवाड यांच्या वागणूक व वर्तणूकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आता पर्यंत के पी पाटील व त्यांच्या स्टाफची सहकार्याची भूमिका राहिली आहे पण गायकवाड नामक अधिकारी आल्यापासून स्टाफ , सहकारी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे.एका उमेदवाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, काही स्थानिक पदाधिकारी अधिकारी वर्गाला हाताशी धरून , काही उमेदवारांवर दबाव आणून बिनविरोध करण्यासाठी सर्वतोपरी व कसोशीने प्रयत्न करीत होते म्हणून पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ केली असावी असे सांगितले.


जर निवडणूक अधिकारी अशा प्रकारची भूमिका बजावत असतील तर अशा निवडणुकीला अर्थच काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.कापुस उत्पादक शेतकरी मतदार संघ प्रतिनिधी (१५) , अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी (०१) , महिला प्रतिनिधी (०२) , इतर मागासवर्गीय प्रतिनिधी (०१) ,भटक्या विमुक्त जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी (०१), बिगर कापुस उत्पादक शेतकरी मतदार संघ प्रतिनिधी (०१)
एकूण जागा २१ आहेत.


२१ जागांसाठी तब्बल ५३ उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत. त्यात महा विकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी सरळ लढत होणार आहे तर ११ उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. महा विकास आघाडीला हेलिकॉप्टर चिन्ह मिळाले असून भारतीय जनता पार्टी यांना रोड रोलर हे चिन्ह मिळाले आहे तर अपक्षांना वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह देण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More