जुगार अड्डयांवर छापा; ७ जणांना अटक; चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई !!

जुगार अड्डयांवर छापा; ७ जणांना अटक; चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई !!


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी –


चोपडा तालुक्यातील येथील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वेळोदे या गावात अनेर नदीच्या काठावर सुरु असलेल्या दोन जुगार अड्डयांवर ग्रामीण पोलीसांनी छापा मारुन जवळपास १८ हजाराच्या मुद्देमालासह ७ जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील वेळोदे या गावी अनेर नदीच्या काठावर दोन ठिकाणी जुगार सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यामुळे चोपडा ग्रामीण पोलीसांनी त्याठिकाणी छापा टाकला. त्यामध्ये ११८१० रू रोख रक्कम व ६००० रुपयाचा मोबाईल असा एकुण १७८१० रुपयांचा मुद्देमाल मिळाला. या छाप्यामध्ये गुलाब सुभाष कोळी वय ४७ रा. वेळोदे, गुरु तात्या वैद्य वय ४० रा. हातेड खु., रमेश भाऊराव पाटील वय ५५ रा. वेळोदे, रमेश गुलाब पाटील वय ५२ रा. घोडगांव, सुरेश रामचद्र कोळी वय ४० रा. वेळोदे, शांताराम भगवान कोळी वय ३० रा. वेळोदे, शाहरुख नगीन मौले वय २६ रा. भावेर ता. शिरपुर यांचेविरुध्द चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला पत्ता जुगाराचा गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करण्यात आली आहे.


सदर कारवाई सहा. पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले यांचे मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीणचे प्रभारी सहा. पोलीस निरिक्षक संदीप दुनगहु, पोलीस उपनिरिक्षक अमरसिंग वसावे, पोहेकॉ. शिवाजी बाविस्कर, पोहेकॉ. संजय येदे, पोना. शशिकांत पारधी, पोना. किरण पाटील, पोकॉ. सुनिल कोळी पोकॉ. संजय चव्हाण, पोकॉ. प्रविण पाटील आदिंच्या पथकाने केली….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More