वाळू चोरीची टीप देतो या कारणावरून एकास मारहाण; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल…

वाळू चोरीची टीप देतो या कारणावरून एकास
मारहाण; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-


चोपडा शहरातील गोरगांवले रोड वरील हॉटेल नाना का ढाबा जवळ फिर्यादी कुणाल प्रदिप पाटील रा. पाटीलगढी हा महसुल व पोलीस विभागाला रेती चोरीच्या टिप देतो या कारणावरुन फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड, लाकडी काठी तसेच चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. म्हणून ९ जणांवर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेले लोखंडी रॉड, लाकडी काठी, होंडा हॉर्नेट मोटारसायकल, बजाज प्लॅटीना मोटारसायकल जप्त करण्यात आले आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. १५ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास गोरगावले रोडवरील हॉटेल नाना का ढाबा जवळ आरोपी यांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन, फिर्यादीस महसुल व पोलीस विभागाला, आमच्या रेती चोरीच्या टिपा का देतो? या कारणावरुन फिर्यादीस तुला खुप माज आला आहे, तुला तुझा जिव प्यारा नाही का, तुला संपवुन टाकतो अशी शिवीगाळ, दमदाटी करुन सर्व ९ आरोपींनी फिर्यादीस चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी दिगंबर रविंद्र सोनवणे याने भगव्या रंगाच्या होंडा हॉर्नेट मोटार सायकलीस लावलेला लोखंडी रॉड काढुन, लोखंडी रॉडने फिर्यादीस जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर मारुन दुखापत केली. तसेच आरोपी सागर रविंद्र सोनवणे याने बाजुस उभी असलेल्या प्लॅटीना मोटार सायकलला बांधलेली लाकडी काठी काढून त्याने फिर्यादीच्या पाठीवर मारहाण करुन दुखापत केली म्हणून चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे सीसीटीएनएस गुन्हा रजि. नं. ५१८/ २०२२ भादंवी कलम ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ नुसार ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More