चोपडा येथे महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर घेऊन केले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन#८०भगिनींनी घेतला शिबिराचा लाभ

चोपडा येथे महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर घेऊन केले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन#८०  भगिनींनी घेतला शिबिराचा लाभ..


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा( प्रतिनिधी):-


चोपडा:- येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ चा माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला भगिनींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन मल्हारपूरा येथे करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ प्राजक्ता स्नेहलकुमार भामरे ह्या होत्या तर प्रमुख मान्यवर म्हणून माळी समाजाचे अध्यक्ष के एस महाजन सर, उपाध्यक्ष एन व्ही महाजन सर, सचिव मुकेश महाजन, शिवसेनेचे शहर प्रमुख तथा  क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ (महाराष्ट्र, मध्य प्रदेश,गुजरात) चे सदस्य नरेश लक्ष्मण महाजन हे उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराला सुरुवात करण्यात आल.

चोपडा येथील महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात शिबिराचा लाभ घेतला या शिबिरात महिलांच्या विविध समस्या बाबत डॉ प्राजक्ता स्नेहलकुमार भामरे यांनी मार्गदर्शन केले त्या म्हणाले की महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आपण आपल्या आरोग्य चांगले राहील तर आपण परिवाराकडे चांगलं लक्ष देऊ त्यामुळे समाज सुदृढ होईल असेही त्यांनी सांगितले.तसेच के. एस.महाजन सर यांनीही कॅन्सर सारख्या भयानक रोगापासून आपण कसे वाचले पाहिजे, कोरोना महाभयंकर विषाणूपासून सारख्या पासून कसे आपले कुटुंब सुरक्षित राहील यासाठीही मार्गदर्शन केले.

शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्तगट तपासणी करण्यात आली.शिबिरासाठी श्री संत सावता माळी युवक संघाच्या महिला जिल्हा अध्यक्षा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेविका संध्या नरेश महाजन, मंडळाच्या उपाध्यक्ष मीना हिरालाल माळी, सचिव अंजना गुलाब माळी, सहसचिव वैशाली मुकेश महाजन, माऊली महिला मंडळाचे अध्यक्ष मायाताई महाजन कीर्ती मोहन माळी, हर्षनंदा महाजन,अनिता संजय महाजन,सुनीता दिनेश महाजन, शीला वामन मगरे, तिलोत्तमा सुदर्शन महाजन, संगीता गोपाल महाजन,दिपाली प्रकाश महाजन,भारती लीलाधर महाजन, योगिता भूषण महाजन, अलकाबाई दिलीप महाजन, अनिता किशोर मगरे, कमलबाई जिजाबराव महाजन, संगीता संजय महाजन,यांच्यासह समाज भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी समाज बांधव राजेंद्र रामचंद्र महाजन यांनी संपूर्ण खुर्च्या उपलब्ध करून सहकार्य केले तसेच  गुलाब महाजन,क्षत्रिय माळी समाज पंच मंडळ मल्हारपुरा संत सावता माळी युवक संघ यांनीही सहकार्य केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More