प्रताप विद्या मंदिराच्या शतकोत्तर पाचव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांना दिमाखदार सुरुवात

प्रताप विद्या मंदिराच्या शतकोत्तर पाचव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांना दिमाखदार सुरुवात

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी):-

चोपडा (प्रतिनिधी) : येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराच्या शतकोत्तर पाचव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांचे दिमाखदार उद्घाटन संपन्न झाले. संस्थेच्या अध्यक्ष शैलाबेन मयूर यांच्या शुभहस्ते संस्थेचे ध्वजारोहण आणि ज्योत प्रज्वलन संपन्न झाले. यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शैलाबेन मयूर आणि उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल यांचा सत्कार देखील पार पडला. तसेच संस्थेच्या परंपरेप्रमाणे सेवानिवृत्त शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा देखील सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. यात माजी मुख्याध्यापक आर आर शिंदे,माजी उपमुख्याध्यापक जी वाय वाणी, माजी उपशिक्षक एस बी कुलकर्णी आणि उर्दू विभागातील सेवानिवृत्त शिक्षिका शाकेरा बी शेख मासूम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आर आर शिंदे यांनी सेवा निवृत्त शिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक पी एस गुजराथी यांनी शाळेच्या यशस्वी निकालाचा आढावा घेतला. वर्षभरात विविध वकृत्व, निबंध, कला, क्रीडा, विज्ञान, शिष्यवृत्ती परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा त्यांनी गौरव केला.शाळेत सुरू असलेल्या स्टेम फोरम, प्रतापिय कला मंच, आयआयटी फाउंडेशन, विद्यार्थी दत्तक योजना आदी विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.


यावेळी गावातील विभागाच्या विद्यार्थ्यांनी एन एन महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नयनरम्य लेझीम प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी वर्षभरात संपन्न झालेल्या सहशालेय उपक्रमांच्या फोटो प्रदर्शनाचे आणि 105 व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध वस्तूंपासून 105 आकार तयार करणाऱ्या प्रतिकृतींचे प्रदर्शनादेखील भरवण्यात आले होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष शैलाबेन मयूर,उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, चेअरमन राजाभाई मयूर, सचिव माधुरी मयूर, कार्यकारणी सदस्य भूपेंद्र गुजराथी, रमेश जैन सर्व आजी-माजी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक विविध ज्ञान शाखांचे पदाधिकारी,शिक्षक बंधू भगिनी आणि लेखनिक कर्मचारी बंधू,समन्वयक गोविंद गुजराथी, डी टी महाजन, पालक बंधू आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे इशस्तवन पी बी कोळी, पंकज नागपुरे आणि त्यांच्या समूहाने सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज शिंदे आणि एजाज शेख यांनी पार पाडले. आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक एस जी डोंगरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More