विद्युत तारांचा धक्का, चोपड्यात महिलेचा मृत्यू महावितरणच्या अधिकारी, कर्मचारीविरुद्ध गुन्हा

विद्युत तारांचा धक्का, चोपड्यात महिलेचा मृत्यू महावितरणच्या अधिकारी, कर्मचारीविरुद्ध गुन्हा
दाखल !


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-
चोपडा शहरातील हॉटेल जयेशच्या मागे विद्युत तारांचा धक्का लागल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दोन महिन्यापूर्वी घडली होती. या प्रकरणी मयत विवाहितेच्या भाऊच्या फिर्यादीवरून चोपडा पोलिसात महावितरणच्या अधिकारी, कर्मचारींविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.


या संदर्भात अधिक माहिती अशी की, चोपडा शिवारातील हॉटेल जयेशच्या मागे महाराष्ट्र विद्युत वीज कंपनीच्या ११ के. व्ही विद्युत तारांचे जमिनी पासूनचे अंतर नियमापेक्षा कमी होते. महाराष्ट्र विद्युत वीज वितरण कंपनी, चोपडा यांनी विद्युत संच मांडणीवर योग्य निगा, देखभाल व दुरुस्ती न केल्यामुळे सदर ठिकाणी दि. १५ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास अनिता महेंद्र अहिरे (वय ३५ वर्षे रा. शेतपुरा चांभारवाडा, चोपडा) ही कचरा वेचत असताना, जमीनीलगत आलेल्या विद्युत तारांचा धक्का लागून मयत झाली होती. या घटनेस महाराष्ट्र विद्युत वीज वितरण कंपनी, चोपडा याचे संबंधित अधिकारी व कमर्चारी जबाबदार असल्याची फिर्याद मयत महिलेचा चुलत भाऊ विजय अशोक खजुरे (वय ३१, रा. शेतपुरा, चोपडा) यांनी दिली आहे. त्यानुसार चोपडा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो.ना. संतोष पारधी हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More