वढोदा नंतर तांदळवाडी गाव एकवटले ,वाळू ठेका देण्यास प्रांत अधिका-यांसमोर स्पष्ट विरोध…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतीनिधी :-
चोपडा तालुक्यातील वाळू लिलावाचा पेच सुटताना दिसत नाही. तालुक्यातील वाळू लिलावासाठी मागवलेल्या अहवालात कोळंबा वगळता जवळ जवळ सर्वच ग्राम पंचायतीने विरोध दर्शविला आहे. कोळंबा येथील ग्रामस्थांनी जरी पॉझिटिव अहवाल दिला असला तरी भूजल सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मात्र कोळंबा येथील अहवाल निगेटिव्ह दिला आहे .त्यात तांदळवाडी येथील ग्रामपंचायत मार्फत ग्रामसभेचे आयोजन दि.१२ रोजी प्रांतअधिकारी सिमा अहिरराव यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली.


सदर ग्रामसभेत वाळू ठेका देण्या संदर्भात चर्चा करण्यात आली.आचार संहिता असल्यामुळे मा.जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवाणगीने या मिटींगचे आयोजन करण्यात आले होते.या ग्रामसभेत फक्त वाळू ठेका संदर्भात चर्चा करण्यात आली.मागील ग्रामसभेत वाळू ठेका न देण्या संदर्भात ठराव पाठविण्यात आला होता.
त्यात प्रांतअधिका-यांनी वाळू विरोधात ठेका न देण्याचे कारण विचारले असता ग्रामस्थांनी येणा-या अडचणींचा पाढा वाचला.यात पाण्याची पातळी, कुपनलीकांचे पाणी आटणे,वाळू उपसा झाला तर पाण्याची पातळी कमी होते,सर्व रहदारी रस्ता गावातुन आहे.उन्हाळ्यात तापी नदीची पाण्याची पातळी कमी होऊन टुबवेलचे पाणी कमी होते.

गावातील सर्व टुबवेलचे पाणी ७० फुटावर होते आता १६० पेक्षा जास्त आहे.आतापर्यंत तापी नदी ब-यापैकी वाहत आहे पण वाळू ठेका दिल्यामुळे बारमाही वाहणारी नदी जानेवारीतच कोरडी पडते.अशा अनेक विषयांवर चर्चा करून वाळू ठेका देण्यास स्पष्ट विरोध केला.यावेळी प्रांताधिकारी सिमा अहिरराव,व त्यांचा स्टाफ,तलाठी कल्पेश कुवर,ग्रामसेवक भैयासाहेब साळूंखे,सरपंच सिंधुताई भिल्ल उपसरपंच पिंटू धनगर,दिपक पाटील,देवेंद्र पाटील,विनोद धनगर,सुनिल पाटील व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













