ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी..

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी…

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा( प्रतिनिधी):-

चोपडा- येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये राजमाता जिजाबाई स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवा दिना निमित्त कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती आणि शाळा-समन्वयक सुचिता पाटील, अश्विनी पाटील, अमन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जडणघडणीमध्ये जिजामाता यांचे अमूल्य असे योगदान आहे. त्यांच्या बालपणाविषयी, युद्ध कौशल्य, राजनीति, वीरता, कुशल शासक व मार्गदर्शक म्हणून कायम शिवाजी महाराज व सबंध मावळ्यांच्या कायम खंबीरपणे पाठीशी उभ्या राहणाऱ्या जिजामातांविषयी विषयी शाळेतील सहाय्यक शिक्षक अमन पटेल यांनी विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली.


12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ‘युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य असणारे स्वामी विवेकानंद हे एक महान तत्त्वज्ञ होते. अमेरिका येथे झालेल्या शिकागो मधील धर्मपरिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. संपूर्ण जगाला हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाची ओळख करून देणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्याविषयी शाळेतील शिक्षक अमन पटेल यांनी विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More