विनाअनुदानित शिक्षकांच्या आत्महत्ये संदर्भात चोपडा तालुक्यात कलाध्यापक संघाने दिले निवेदन

विनाअनुदानित शिक्षकांच्या आत्महत्ये संदर्भात चोपडा तालुक्यात कलाध्यापक संघाने दिले निवेदन

चोपडा (प्रतिनिधी ) येथील चोपडा तालुका कलाध्यापक संघ पदाधिकारी व सदस्यांनी एकत्र येऊन अनुदानास पात्र असलेल्या विनाअनुदानित तुकड्यांवर काम करणाऱ्या बिनपगारी शिक्षकांच्या वाढत्या आत्महत्या संदर्भात निवेदन सादर केले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, या सप्ताहात दिनांक 15 जुलै 2020 रोजी निंबापुर, महालपाडा ता.डहाणू,जि. पालघर येथील कै.गंगाराम रमेश चौधरी या चित्रकला शिक्षकाने (वय 31 वर्ष ) आपले स्वतःचे चित्र रेखाटून त्यावर मृत्यू दिनांक लिहून त्याच दिवशी आत्महत्या केली. या हृदयद्रावक घटनेमुळे चोपडा तालुक्यातील सारे कलाशिक्षक हादरले आहेत. आजही पंधरा ते वीस वर्षांपासून विनाअनुदान तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या फार मोठी आहे.त्यांना कधी न्याय मिळेल? एकंदरीत सरकारने ( शिक्षण विभागाने ) आजपर्यंत कला शिक्षकांवर अन्याय केला आहे. व आजही अन्याय होत आहे.कला विषय जीवनाचे खरे शिक्षण देणारा असून यात कला शिक्षकाचे गंडांतर केले जात आहे.राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानास पात्र असलेल्या शाळांच्या अनुदान वितरणाच्या वाढीव टप्पा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करुन तसेच, सर्व अघोषित शाळा, तुकड्या यांना निधी सहित घोषित करून, न्याय द्यावा.लॉकडाऊन च्या काळात उपाशीपोटी, शिक्षकांच्या खात्यावर तातडीने पगार जमा व्हावे. जेणेकरून शिक्षक व त्यांचे कुटुंब त्यांची होत असलेली उपासमार ,हेळसांड थांबेल. मागील बऱ्याच वर्षापासून विनाअनुदानित शिक्षकांना एक रुपया देखील पगार नसल्यामुळे त्यांना खूप मोठ्या संकटांना सामना करावा लागत आहे. त्यांचे उपजीविकेचे मार्ग बंद होत आहेत त्यामुळे या परिस्थितीतून, अवस्थेतून दिवसेंदिवस शिक्षकांचे मृत्यू ,आत्महत्या होत आहे.यासंदर्भात चोपडा तालुक्यातील सर्व कलाशिक्षक वरील घटनेमुळे अत्यंत दुखी व पिडीत आहे.त्यांनी चोपडा तालुक्याचे तहसीलदार व चोपडा पंचायत समिती (शिक्षण विभागाचे)गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले कि, महाराष्ट्रातील सर्व विनाअनुदानित शिक्षकांना अनुदानास पात्र ठरवत लवकरात लवकर अनुदान द्यावे व कै. गंगाराम चौधरी या मृत कलाशिक्षकाच्या परिवाराला शासनाकडून मदत मिळावी.त्याच्या परिवारातील एका सदस्याला शासन सेवेत दाखल करावे. कृपया या निवेदनावर लवकरच विचार व्हावा व कार्यवाही व्हावी अन्यथा सर्व शिक्षक आमरण उपोषणासाठी तयार आहेत अशा प्रतिक्रिया शिक्षण विभागातील सर्व शिक्षक बांधवांकडून येत आहेत.असे निवेदन देतेवेळी चोपडा तालुका कलाध्यापक संघाचे जळगाव जिल्ह्याचे उपाध्यक्ष दिनेश बाविस्कर, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, माजी अध्यक्ष ए.पी.पाटील,तज्ञ सल्लागार प्राचार्य राजेंद्र महाजन,कोषाध्यक्ष पंजाब बाविस्कर,सदस्य राकेश विसपुते,नारायण पाटील आदी.उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More