चोपडा तालुक्यातील मेलाणे येथे ग्रामसेवकाच्या गैरवर्तनामुळे ग्रामस्थ आक्रमक; बदलीच्या मागणीसाठी सरपंचांसह ३०० नागरिक BDO कार्यालयावर

चोपडा तालुक्यातील मेलाणे येथे ग्रामसेवकाच्या गैरवर्तनामुळे ग्रामस्थ आक्रमक; बदलीच्या मागणीसाठी सरपंचांसह ३०० नागरिक BDO कार्यालयावर

महाराष्ट्र9न्युज नेटवर्क ​चोपडा 

अनुसूचित क्षेत्रातीलचोपडा तालुक्यातील मेलाणे येथील ग्रामसेवकाकडून सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांशी वारंवार गैरवर्तन, उद्दामपणाची भाषा आणि ग्रामपंचायतीच्या कामात अनावश्यक अडथळे निर्माण केले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे गावातील प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले असून वातावरणावर विपरीत परिणाम होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवकाच्या तात्काळ बदलीची मागणी लावून धरली आहे.

​या समस्येबाबत ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप शंकर पावरा, सदस्य अनिल रामचंद्र पावरा, युवा आदिवासी सामाजिक कार्यकर्ते नामा पावरा, प्रवीण पावरा, शामशेर पावरा तसेच पवार गटाचे राज्य प्रवक्ता डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या पुढाकाराने ३०० हून अधिक ग्रामस्थांनी पंचायत समिती गाठली. ग्रामसेवकाच्या गैरवर्तनाबाबत आणि क्षमतेबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे (BDO) तक्रार अर्ज सादर करून कैफियत मांडण्यात आली.

​सरपंच आणि ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की, ग्रामसेवक हे समन्वय साधून काम करण्याऐवजी वाद घालतात. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून ग्रामसेवकाची इतरत्र बदली करण्यात यावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी अर्जाद्वारे करण्यात आली आहे. 

​दरम्यान, लोकसंख्या जास्त असल्याने संबंधित ग्रामसेवक काम पाहण्यास अक्षम असल्याचे सांगत सरपंचांसह २०० ते ३०० ग्रामस्थ दोन वेळा BDO कार्यालयात गेले होते. मात्र, ग्रामस्थांची मागणी ऐकून घेऊन वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठविण्याऐवजी “हा प्रशासकीय अधिकाराचा विषय आहे” असे सांगून प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे. तसेच, नागरिक मोठ्या संख्येने कार्यालयात जमा झाल्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण होऊ शकतो असे कारण दाखवत पोलिसांना पाचारण करून ग्रामस्थांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.

​गावातील कामकाज सुरळीत, पारदर्शक व शांततेच्या वातावरणात चालण्यासाठी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन प्रशासकीय कारवाई करावी, अशी ठाम भूमिका मेलाणे ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी घेतली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More