पंकज प्राथमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी ….

पंकज प्राथमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी ….


महाराष्ट्र9 न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-


चोपडा येथील पंकज प्राथमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील होते तर प्रमुख वक्ते म्हणून मनोज अहिरे हे होते.


सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. दरम्यान त्यांच्या कार्यावर प्रमुख वक्ते मनोज अहिरे यांनी प्रकाश टाकला. ते आपल्या मनोगतात म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांचे विचार सर्व मानवजातीला प्रेरक असे आहेत. जीवनाची दिशा व गती बदलण्यासाठी स्वामी विवेकानंद यांचे विचार नक्कीच उपयुक्त ठरतील. स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या स्वाभिमानी जाधव यांची कन्या,भोसले यांची सून, राजमाता जिजाऊ यांची जयंती , स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे आणि प्रतापशाली संभाजीराजे छत्रपतींना घडविणाऱ्या मातेच्या आज जन्मदिवस. आई म्हणजे प्रेम, आपुलकी, प्रेरणा, त्याग, सहनशीलता, जिद्द, संयम, सामर्थ्य यांचा संगम होय.


विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे विचार जीवनात जर अंमलात आणले तर प्रत्येकाचे जीवन नक्कीच धन्य होईल. याप्रसंगी विद्यालयाचे विद्यार्थी स्वामी विवेकानंद यांच्या भूमिकेत उपस्थित होते तर विद्यार्थीनी राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.अनेक विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. इयता सहावीच्या विद्यार्थिनींनी नृत्य व गीत सादर केले.


सदर कार्यक्रमासाठी चंद्रकांत जाधव, अनिल पाटील, दिलीप जयस्वाल, आर डी पाटील, योगेश चौधरी, सी आर चौधरी, गायत्री शिंदे,जयश्री पाटील, उज्ज्वला जाधव, ज्योती महाजन, प्रियंका पाटील,प्रशांत पाटील, मनोज अहिरे, महेश गुजर, मयुर पाटील, स्वप्निल ठाकूर, प्रफुल्ल महाजन, सचिन लोखंडे, नितीन वाल्हे आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिलीप बाविस्कर, संदीप पाटील, रवी शार्दुल, कैलास बोरसे, प्रमोद पाटील आदींनी परिश्रम घेतले…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More