डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्नीसह साबरमती आश्रमात चालवला चरखा…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अहमदाबाद विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प कुटुंबियांचं अहमदाबाद विमानतळावर स्वागत केलं. यावेळी मोदी यांनी ट्रम्प यांची गळाभेट घेतली. ट्रम्प यांचा ताफा विमानतळाकडून साबरमती गांधी आश्रमाकडे रवाना झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांची प्रचंड गर्दी पहायला मिळत मिळाली आहे.साबरमती आश्रमात ट्रम्प सपत्नीक पोहचल्यानंतर त्यांचे आश्रमच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी आश्रमातील अभिप्राय नोंद वहित अभिप्राय लिहिला नंतर ट्रम्प यांनी पत्नी मेलानियासोबत चरखा चालवला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. चरख्याची माहिती ऐकताना ट्रम्प खूप उत्साही दिसत होते. ३६ तासांच्या दौऱ्यात ट्रम्प अतिशय व्यस्त असणार आहेत. भारताच्या दौऱ्यावर येणारे ट्रम्प सातवे अमेरिकेचे अध्यक्ष असणार आहेत.













