वडीलांच्या मृत्यूच्या दुःखद परिस्थितीतही दिपक बोरसेने दिला १२ वी बोर्डाचा पेपर

वडीलांच्या मृत्यूच्या दुःखद परिस्थितीतही दिपक बोरसेने दिला १२ वी बोर्डाचा पेपर


महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित कला,शास्र व वाणिज्य महाविद्यालयात सेंटर क्र.८४० येथे पंकज विद्यालय चोपडा १२ विज्ञान वर्गातील विद्यार्थी दिपक सुरेश बोरसे यांचे वडील सुरेश शांतीलाल बोरसे,शासकीय माध्यमिक विद्यालय वरला येथिल शिक्षक ह.मु.हेमलता नगर चोपडा,यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले डोक्यावर डोंगराएवढे दुःख कोसळले असतांना दिपकने बोर्डाचा पूर्व नियोजीत जीवशास्र विषयाचा ११ ते ०२ या वेळेत पेपर दिला.
या वेळी उपकेंद्रसंचालक व पर्यवेक्षक प्रा.व्ही.वाय.पाटील,प्रा.एस.पी.पाटील,प्रा.एन.बी.शिरसाठ,यांनी विद्यार्थ्यांचे सांत्वन केले.
मृत सुरेश बोरसे यांच्या पश्चात पत्नी संगीता बोरसे,मुलगी अर्चना बोरसे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More