आमदार व माजी आमदार तहसीलदार,यांनी अवकाळी पावसाने पिकांच्या नुकसान झालेल्या गावांची केली पाहणी व पंचनाम्याचे आदेश

अवकाळी पावसाचे थैमान सुरु झाले असून तालुक्यात तुरळक गारपीट वादळी वारा झाल्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामातील उरली सुरली पिके पूर्णत: नष्ट होऊन बळीराजा पुरता ‘गार’ झाला आहे.

दि . १७ मार्च २०२० मंगळवार रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमुळे चोपडा तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे . या झालेल्या नुकसानीची पाहणी करतांना माननीय आ . सौ . लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आ . प्रा . श्री . चंद्रकांतजी सोनवणे . यावेळी गोरगावले खु . गोरगावले बु . , माचला , सनपुले , कुरवेल , गरताळ , वडगावसीम , खेडीभोकरी , कठोर , कोळंबा येथे प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला . यावेळी महिला जिल्हा आघाडी प्रमुख रोहिणीताई पाटील , राजूभाऊ बिटवा , नगरसेवक किशोर चौधरी , प्रकाश पाटील , सुकलाल कोळी , एम . व्ही . पाटील , भूषण पाटील , जगदीश मराठे , प्रांतअधिकारी सीमा अहिरे , तहसीलदार अनिल गावित , बीडीओ . बी . एस . कोसोदे महावितरणचे सावकारे साहेब पवार साहेब . न . पा . मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे तसेच परिसरातील शेतकरी बांधव संख्यने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More