घनश्याम भाऊ अग्रवाल यांच्या कडून आज नवीन दिव्य कामाला चोपड्यात प्रारंभ

प्रतिनिधी | चोपडा
चोपडा तालुक्यातील दानशूर व्यक्तिमत्त्व आजच्या युगातील साक्षात कर्ण म्हणून ज्याची ओळख आहे अश्या उद्योगपती भाउसो घनश्यामजी अग्रवाल यांनी स्वतः उत्तम क्वॉलिटी असलेली खिचडी वाटपाला चोपडा शहरात सुरुवात केली असून आज पहिल्या दिवशी घनश्याम भाऊ अग्रवाल मित्र मंडळाचे सदस्य सागर पठार याच्या कार्यक्षेत्रात म्हणजे शेतपूरा भागात ही खिचडी वाटप करण्यात आली.
गेल्या 13 वर्षांपासून मा घनश्याम भाऊ सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या लाखो भाविक भक्तसाठी चिखलहोळ गावी महाभंडारा देत असतात यावर्षी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर तो रद्द असला तरी त्याची भर निघावी म्हणून *काल परवा राज्यसरकार व केंद्रसरकार ला एक लाखाची आर्थिक मदत केल्यानंतर आणि *दिव्य मराठी अभियानाला अकरा हजार* दिल्यानंतर आज पुन्हा खिचडी वाटपाचा दिव्य कामाला सुरुवात केली असून ज्या भागात खरोखर अन्नधानाची गरज आहे असे आमच्या मित्र मंडळाला कळवावे.
घनश्याम भाऊ अग्रवाल मित्र मंडळाने तालुक्यात गेल्या चार पाच वर्षोपासून मोठं मोठ्या दिव्य कांमाना हाती घेत गरजू लोकांना कसा फायदा होईल हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मार्गक्रमण करत आहे
विशेष म्हणजे पाणी आडवा पाणी जिरवा,50 जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उन्हाळ्यात बूट वाटप,
महारक्तदान शिबिर,वृक्ष लागवड,राज्य किव्हा केंद्र सरकारने आवाहन केल्यानंतर मोठी आर्थिक मदत,(नुकतेच एक लाख,केरळ पुरग्रस्तांचा मदतीसाठी पन्नास हजार,सातारा सांगली पुरग्रस्तांचा मदतीसाठी रोख 25 हजार यासह अनेक समाजीक कार्यातून घनश्याम भाऊ यांनी मोठं दिव्य काम तालुक्यात सुरू केले असून या सर्व कामी मित्र मंडळाची मोठी मदत असून आर्थिक खर्चाचा बोजा हा सर्व आपले सर्वांचे भाऊ अर्थात घनश्याम भाऊ सांभाळतात आणि परमेश्वर पण ही बुद्धी त्यांना देते हे मोठं विलक्षण कटू सत्य आहे

- चोपडा शहरात खरोखर गरजू ना मदत हवी असेल तर हाक मारा आमच्या घनश्याम भाऊ अग्रवाल मित्र मंडळाला सर्व खर्च एकटे भाऊ करतील असे आवाहन नेहमी साठी करण्यात आले आहे
आज पहिल्या दिवशी चोपडा शहरात संचार बंदी काळात ज्यांना खरोखर गरज आहे अश्या भागात जाऊन हे खिचडी वाटपाचे काम हाती घेण्यात आले आहे.घनश्याम भाऊ अग्रवाल मित्र मंडळाला खिचडी वाटप साठी शेतपुरा भागातील अजय बडगुजर ,जयेश बडगुजर प्रवीण धोबी,महेंद्र महाले, ईश्वर अलकरी,सागर अलकरी, भिकन बडगुजर,योगेश बडगुजर, अक्षय बडगुजर ,लखन बडगुजर,गौरव चौधरी,व नवग्रह मित्र मंडळ, शेतपुरा यांनी मोठं सहकार्य केले आहे












