आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवारातर्फे दिव्यांग बांधवाना मोफत तीन चाकी सायकल आणि मोफत श्रवणयंत्र वाटप करण्यात आले

आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवारातर्फे मतदार संघातील ८० दिव्यांग बांधवाना मोफत तीनचाकी सायकल आणि कमी ऐकू येत असणाऱ्यांना मोफत श्रवणयंत्र वाटपाचा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह परिसरात नुकताच पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) चे अध्यक्ष डॉ नितीन शिवाजीराव पाटील होते, तर प्रमुख अतिथी म्हणून वेलनेस अम्बेसेडर डॉ रेखा चौधरी,सौ अनिता चौधरी,महिला बालकल्याण व अपंग पुर्नवसन विकास महामंडळचे दिनेश ठाकरे, गटनेते प्रवीण पाठक, श्रीराम चौधरी, पांडुरंग महाजन, डॉ निखिल बहुगणे, डॉ प्रकाश ताळे, डॉ भूषण पाटील, डॉ मिलिंद नवसरीकर, डॉ शरद बाविस्कर, डॉ किरण बडगुजर, डॉ श्यामकांत नेरकर, डॉ विलास महाजन, नगरसेविका कल्पना चौधरी, ज्योती महाजन, नगरसेवक सलीम शेख, श्याम पाटील, महेश जाधव, किरण बागुल, सुनील भामरे, अविनाश जाधव, गौरव चौधरी, प्रा राजेंद्र महाजन,आबु महाजन, बिरजू चौधरी, गुलाम नबी, सुदरपट्टी सरपंच सुरेश पाटील, रमेश पाटील, हिरामण पाटील, राजेंद्र पाटील, सोपान लोहार ,संतोष लोहरे, या प्रसंगी उपस्थित होते.आ.शिरीष चौधरी यांनी पुढे बोलताना हात पाय गमावलेल्या दिव्यांग बांधवांसाठी देखील योगदान देण्याची तयारी दर्शवून त्यांच्यासाठी मोफत जयपुरी पद्धतीचे कुत्रीम अवयव बसविले जातील असे जाहीर केले.
अपंग बांधव प्रसाद कापडे आपल्या मनोगतात म्हणाले की गेल्या ३६ वर्षाच्या काळात अपंगांना सायंकलरूपी भेट देणारे आमदार चौधरी पाहिला पहिलेच आमदार असून अपंगांचे पगार सुद्धा प्राधान्याने ते मंजूर करत असतात, प्रत्येक दिव्यांग बांधवाला सर्व प्रकारचा लाभ मिळावा हीच त्यांची तळमळ असते,यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांना खंबिर साथ देऊन त्यांच्या प्रेमा इतकाच मतांचा पाऊस देखील पाडू असा संकल्प त्यांनी जाहीर केला.
अपंग बांधव यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करत म्हणाले की गेल्या ३६ वर्षाच्या काळात अपंगांचा विचार करून सायंकलरूपी भेट देणारे आमदार चौधरी पहिलेच आमदार असून प्रत्येक दिव्यांग बांधवाला सर्व प्रकारचा लाभ मिळावा हीच त्यांची तळमळ असते,यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांना निवडून आणू अशी प्रतिक्रिया दिव्यांग बांधवांनी दिली
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप बहिरम यांनी केले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव तसेच कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.












