खाजगी वाहन चालकांकडून पोलिस हप्ते मागत असल्याची वाहन चालकांची खा. रक्षा खडसे यांच्याकडे तक्रार… रक्षा खडसेंनी व्यक्त केली डीवायएसपी रावलेंकडे नाराजी…

खाजगी वाहन चालकांकडून पोलिस हप्ते मागत असल्याची वाहन चालकांची खा. रक्षा खडसे यांच्याकडे तक्रार… रक्षा खडसेंनी व्यक्त केली डीवायएसपी रावलेंकडे नाराजी…


महाराष्ट्र9 न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-


चोपडा तालुक्यातील ग्रामीण भाग व शहरी भागातून शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांची खाजगी वाहन चालक वाहतूक करीत असतात. शहरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचावे म्हणून खाजगी वाहनाने विद्यार्थी प्रवास करीत असतात अशा या खाजगी वाहन चालकांकडून चोपडा शहरातील ट्रॅफिक पोलीस त्यांच्याकडून हप्ते मागतात व हप्ता नाही दिला तर कोर्टाची नोटीस पाठवून कोर्टात हजर राहण्यास सांगितले जाते अशा प्रकारची तक्रार रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे चोपड्यात आल्या असता त्यांच्याकडे तक्रार केली .

त्यांनी लगेच शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि चोपडा पोलीस उपविभागीय अधिकारी कृषिकेश रावले यांना भ्रमणध्वनी वरून सदर प्रकार बद्दल विचारणा केली व हप्ता मागणाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आम्हाला वरिष्ठा पर्यंत तक्रार करावी लागेल अशा प्रकारे डी वाय एस पी कृषिकेश रावले यांची कानउघडणी करत नाराजी व्यक्त केली.


चोपडा शहर पोलीस स्टेशन अद्यापही पोलिस निरीक्षकांविनाच….
चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांची अमरावती ग्रामीण येथे बदली झाल्याने सदर पद अद्यापही रिक्त आहे त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांवर कोणाचाच अंकुश दिसून येत नाहीये. शहरात व तालुक्यात अवैध व्यवसाय, अवैध धंदे, गुटखा, सट्टा , पत्ता, अवैध प्रवासी वाहतूक , मोटार सायकली चोरी , घरफोड्या असे अनेक व्यवसाय फोफावत आहेत. त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतोय.
चोपडा तालुक्यात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक वाहतूक नियमांचे तीन-तेरा
एकीकडे देशभरात ११ ते १७ जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या सप्ताह संपून चार दिवस उलट नाही तोवर बोजवारा उडाल्याचे दिसून आले. शहरात खासगी वाहनांमध्ये टपावर बसून वाहतूक केली जाते. याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक, क्षमतेपेक्षा जास्त मालाची धोकेदायक पद्धतीने वाहतूक, बेमुर्वतपणे वेगाने चालवली जाणारी वाहने, वाहनांना बाहेरच्या बाजूने लटकन टपावर बसून प्रवास करणे, वाहतूक नियमांचे पालन न होणे, अल्पवयीन मुला-मुलींनी दुचाकी, चार चाकी चालवणे यासारख्या बाबी आणि त्यामुळे होणारे अपघात नित्याच्या झाल्या आहेत. रस्ते सुरक्षा सप्ताह अंतर्गत केवळ वाहनांबद्दल जनजागृती केली जात असल्याचे दिसते परंतु रस्त्यांच्या दुर्दशेकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष चोपडा तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खाजगी वाहनांद्वारे प्रवाशांची ने-आण केली जाते. बऱ्याच वेळा या वाहनांचे वाहन चालक यांनी रीतसर प्रशिक्षण घेतले नसल्याचे किंवा परवानाधारक नसल्याचेही आढळून येते. या वाहनांची नियमित तपासणी केली जात नाही. तसेच या वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची किंवा मालाची वाहतूक सर्रासपणे केली जाते. पोलीस प्रशासन यावर कधी-कधी कारवाई तर बऱ्याच वेळा अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जाते…


पोलिस कर्मचाऱ्यांची वाहन धारकांवरील कारवाई योग्यच… कृषिकेश रावले ( डी वाय एस पी – चोपडा )…
खाजगी वाहन चालक व विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांच्याकडे पोलीस कर्मचाऱ्यांची तक्रार केली होती की, पोलीस कर्मचारी वाहन चालकांना विनाकारण त्रास देतात, हप्त्यांची मागणी करतात, हप्ते दिले नाहीत तर कोर्टाची नोटीस बजावतात या संदर्भात डीवायएसपी कृषिकेश रावले यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पोलीस कर्मचारी अवैध वाहतूक करणाऱ्या तसेच क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर व चालकांवर योग्य ती कारवाई करीत आहेत. कोणतीही कारवाई चुकीची नसून कायद्याला अनुसरून कारवाई केली जात आहे .या गोष्टीच्या चुकीच्या अर्थ काढून गैरसमजाने खाजगी वाहन चालक व विद्यार्थ्यांचे वाहन चालवणाऱ्यांनी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे चुकीची माहिती दिल्याने हा गोंधळ झाल्याचे सांगितले तरी ज्या वाहनचालकांनी योग्य कारवाईला चुकीची कारवाई समजत पोलीस कर्मचाऱ्यांवर चुकीचे विधान केले आहे त्यांच्या तपास सुरू असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More