विरवाडे येथे तलवारीने दहशत माजवत महिलेचा विनयभंग… एका विरुद्ध गुन्हा दाखल…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-
चोपडा तालुक्यांतील विरवाडे येथे आरोपी पवन रोहिदास कोळी याने फिर्यादीचे पती सोबत भांडण करुन हातात तलवार घेवुन फिर्यादीचे घरी जावुन घरा बाहेर आरडाओरड करीत असल्याने फर्यादीने आरोपी पवन रोहिदास कोळी यास समजवित असतांना आरोपी पवन रोहिदास कोळी याने फिर्यादीचे मनास लज्जा होईल असे कृत्य केले.


यावेळी फिर्यादीने आरडा ओरड केल्याने फिर्यादीचे पती, सासु व गल्लीतुन जाणाऱ्या इतर महिलांनी फिर्यादीची आरोपी पवन रोहिदास कोळी पासुन फिर्यादीस सोडविले असता आरोपी पवन कोळीने त्यांच्यावर सुध्दा हातातील तलवार उगारुन जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून चोपडा शहर पोलिस ठाण्यात सी सी टी एन एस गु.र.न. ३३ / २०२३ भा. द. वि. कलम ३५४ ( अ ) , ५०४, ५०६ आर्म ॲक्ट कलम ४ / २५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील अधिक तपास चोपडा शहर पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक अजित सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ जितेंद्र सोनवणे करीत आहे….













