जैनमुनी अक्षयसागरजी महाराज यांचे दि.28 ला चोपडा शहरात आगमन …
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा( प्रतिनिधी) :-
संत शिरोमणी आचार्य श्री.108 विद्यासागरजी महाराज यांचे परम प्रभावक शिष्य प.पु.मुनिश्री 108 अक्षयसागरजी महाराज यांचे दि. 28 जानेवारी 2023 रोजी सकाळी आठ वाजता ससंघ चोपडा शहरात आगमन होत आहे.

संघात मुनिश्री नेमीसागर ,शैलसागर ,अचलसागर आणी ऐलकश्री.उपशमसागर महाराज उपस्थित आहेत.
मुनींच्या स्वागताची सर्व तयारी आयोजन समिती अध्यक्ष ,उपाध्यक्ष,विश्वस्त , नवयुवक मंडळ ,महिला मंडळ,व समाजबांधवांकडून सुरू असून स्वागत मिरवणुक ग्रामिण पोलीस स्टेशन ,छत्रपती शिवाजी महाराज चौक ,मेनरोड ,गोलमंदिर मार्गाने संत निवास ( रथ गल्ली ) येथे विसर्जित होणार आहे .त्यावेळी
मोठ्या संख्येने जैन बांधवांनी संतांचा दर्शनाचा लाभ घेण्यासाठी उपस्थितीत राहण्याचे आवाहन आयोजन समिती तर्फे करण्यात आले आहे.














