अमळनेर @ हॉट स्पॉट केंद्र , पाच कोरोना पॉझिटिव्ह आढळले


अमळनेर
 : – तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ झाली असुन आज आणखी पाच रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. आता जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या ११ झाली आहे.        कोविड रुग्णालयातून कोरोना संशयित म्हणून स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या व्यक्तींपैकी पाच व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. हे सर्व अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहे. या पाचही व्यक्ती यापूर्वी कोरोना बाधित आढळून आलेल्या अमळनेर येथील मृत महिलेच्या कुटूंबातील आहे. यामध्ये ४ पुरुष व एक महिलेचा समावेश असून हे सर्व पुरुष २७ व २८ वर्षीय तर महिला ३६ वर्षीय आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More