मोठी बातमी : चोपड्यात कुंटणखान्यावर पोलिसांची छापेमारी !
ग्राहकांची पळापळ, कुंटणखाना चालक सात महिलांवर गुन्हा दाखल ; ३६ तरुणींची सुधारगृहात रवानगी !

मोठी बातमी : चोपड्यात कुंटणखान्यावर पोलिसांची छापेमारी ! ग्राहकांची पळापळ, कुंटणखाना चालक सात महिलांवर गुन्हा दाखल ; ३६ तरुणींची सुधारगृहात रवानगी !


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी):-


चोपडा नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर चोपडा उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे सहायक पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या पथकाने छापेमारी करत एकूण ४३ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यातील ३६ तरुणींची जळगाव महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे तर सात महिलांवर चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गोपनीय माहितीच्या आधारावर शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागील परिसरात अवैधरीत्या सुरू असलेल्या कुंटणखान्यावर सहायक पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी पथकासह छापा टाकला. त्यात जिल्ह्यातील तसेच परराज्यातील ४३ तरुणी आढळून आल्या. त्यातील ३६ तरुणींना जळगाव सुधारगृहात पाठवण्यात आले असून कुंटणखाना चालवणाऱ्या सात महिलांवर चोपड़ा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यन्त सुरू होते. या परिसरात पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश राज्यांसह नेपाळ , देशातील तरुणींनाही वेश्या व्यवसायासाठी आणले जात असल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. सदर परीसरात गुन्हेगारीच्या प्रमाणत वाढ झाली होती. मोटार सायकली, मोबाइल आदी चोरीला जाण्याचे प्रमाण देखील वाढले होते. पथकात पोलिस महिला निरीक्षक अजित सावळेंसह कर्मचाऱ्यांचा समावेश होता….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More