राष्ट्रीय लोक अदालतीत6469 प्रकरणापैकी 434 प्रकरण निकाली झाले तर एकूण वसुली 1 कोटी 16 लाख 56 हजार 69 रुपये झाली

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरण 701 पैकी 32 तर दाखलपूर्व प्रकरणे बँक,बीएसएनएल, म.रा.वी. मंडळाच्या व ग्रामपंचायतीच्या दाखलपूर्व 6469 प्रकरणापैकी 434 प्रकरण निकाली झाले तर एकूण वसुली 1 कोटी 16 लाख 56 हजार 69 रुपये झाली.


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी)–

मा. उच्च न्यायालय मुंबई व मा. विधीसेवा प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशान्वये दि.11 फेब्रुवारी 2023 शनिवार रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते यात दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरण 701 पैकी 32 तर ग्रामपंचायतीच्या दाखल पूर्व प्रकरणे, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बीएसएनएल, म.रा.वी. मंडळाच्या दाखलपूर्व 6469 प्रकरणापैकी 434 प्रकरण निकाली झाले तर एकूण वसुली 1 कोटी 16 लाख 56 हजार 69 रुपयांची झाली.


सकाळी ११ वाजता राष्ट्रीय लोक अदालतला सुरुवात झाली. यावेळी पॅंनलवर दिवाणी न्यायाधीश श्रीमती एम. व्ही. पाटील- राठोडे यांच्या सह पंच म्हणून ॲड. पी. एच. पाटील चोपडा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. डी. एस. सोनार, सचिव ॲड. एन. एम. कोळी, तसेच गटविकास अधिकारी बी. एस. कोसोदे , विस्तार अधिकारी संजय मोरे ,जे. पी. पाटील तसेच ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार सोनवणे व सचिव दीपक जोशी,तालुका वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड.अंबादास पाटील, तसेच ज्येष्ठ सदस्य ॲड. एस.डी. पाटील,ॲड. ए.व्ही. जैन, ॲड.पी.बी. काबरे,ॲड. दीपक पाटील , अँड. संदीप जे. पाटील, ॲड.एस. एम. बारी, ॲड.एस.एफ.जैन, .ॲड. एस.डी. सोनवणे, ॲड.यु. बी.पाटील, ॲड.विलास बावीस्कर, . ॲड.नितीन पाटील,ॲड.एस.एस. राजपूत, ॲड. व्ही.एस.नाईक, , ॲड.भैय्या पाटील व ॲड.सचीन पाटील हजर होते. चोपडा न्यायालयातील दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरण ठेवण्यात आले होते त्यातून फौजदारीचे धनादेश अनादर प्रकरणे 13 व कौटुंबिक वादाचे 08 प्रकरण व दिवाणी प्रकरणे 8 व खाजगी फौजदारी प्रकरणे 3 अशी एकूण 32 प्रकरणें निकाली काढण्यात आले यात 26 लाख 68 हजार 59 रुपये वसूली झाली. बँक,मराविम व ग्रामपंचायतीचे दाखल पूर्व प्रकरणे यांची एकूण 6469 प्रकरणातून 434 प्रकरणे निकाली झाले यात 89 लाख 88 हजार 10 रुपये वसूल करण्यात आले. अशी एकूण 1 कोटी 16 लाख 56 हजार 69 रुपये वसूल करण्यात आले.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी बार असोसिएशनचे वकील सदस्य, प्रभारी सहाय्यक अधीक्षक दिनेश राजपूत वरीष्ठ लिपिक ए. एच.परदेशी, कनिष्ठ लिपिक राजेंद्र ठाकूर, डी.एम. महाजन, पी. डी. पाटील, एम. बी. चौधरी, एन.डी. कुलकर्णी, पी.ए. सोनवणे, एस.जे.देवरे, एस.के. पाटील, शिपाई राहुल पाटील, विलास बैसाने, दिपक महाजन व सर्व बँकांचे शाखा व्यवस्थापक आदिंनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More