देवझिरी आश्रम शाळा प्रकरण..
दारू पिऊन विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याप्रकरणी अधीक्षक सचिन गडे अखेर निलंबित…

देवझिरी आश्रम शाळा प्रकरण..
दारू पिऊन विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याप्रकरणी अधीक्षक सचिन गडे अखेर निलंबित…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-


चोपडा तालुक्यातील देवझिरी येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत अधिक्षकाने दारूच्या नशेत मुलींच्या खोलीत शिरून मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता, याप्रकरणी अधीक्षक सचिन गडे याला निलंबित करण्यात आले असल्याची माहीती आदिवासी विभागाचे नाशिक विभागीय अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी प्रतिनिधीशी भ्रमणध्वनी वरुन बोलतांना दिली.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील देवझिरी येथे दि. ५ फ्रेबुवारी रोजी गावात देवीची यात्रा होती. तसेच आश्रम शाळेत अधीक्षिका सुटीवर होत्या तर निवासी जमाल या जेवण करायला गेल्या होत्या याचा गैरफायदा घेत रात्री आठ वाजेच्या सुमारास आश्रम शाळेचा अधीक्षक सचिन गडे हा मद्यधुंद अवस्थेत आला व मुलींच्या खोलीत प्रवेश करून त्यांना लज्जा वाटेल असे कृत्य करू लागला, मुलींनी सदरची घटना शाळा व्यवस्थापनाला सांगितली. या संदर्भात दहा दिवस उलटूनही त्याच्यावर कुठलीच कारवाई होत नाही म्हणून आदिवासी संघटना संतप्त झाल्या होत्या.


अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी यावल प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्याशी चर्चा करून अजून गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल केला होता. तसेच नाशिक विभागीय आयुक्त संदीप गोलाईत यांच्याशी सुध्दा चर्चा केली होती. या घटनेची चौकशी करण्यासाठी यावल प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे, कनिष्ठ विस्तार अधिकारी मनिषा सुलताने देवझिरी येथील आदिवासी आश्रम शाळेत चौकशीसाठी गेले होते. विद्यार्थीनीनी मुख्याध्यापक याच्याकडे अधीक्षक सचिन गडे याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी लेखी अर्ज देऊन करण्यात आली होती. त्या अनुशंगाने यावल आदिवासी प्रकल्पाचे अधिकाऱ्यांनी देवझिरी शासकीय आश्रम शाळेत येवून सर्व घटनेची माहिती घेत सदर प्रस्ताव तात्काळ अप्पर आयुक्त नाशिक येथे पाठवला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सदर प्रकरणी प्राथमिक चौकशी करत आयुक्त संदीप गोलाईत यांनी अधीक्षक सचिन गडे याला निलंबित करण्यात आल्याचे सांगितले. या आशयाचे पत्र यावल प्रकल्प कार्यालयास पाठवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More