प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांची विद्या परिषद सदस्यपदी नियुक्ती

प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांची विद्या परिषद सदस्यपदी नियुक्ती
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी


चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापरिषदेच्या सदस्यपदी राज्यपाल यांनी नियुक्ती केल्याबाबतचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष अँड. संदीप सुरेश पाटील,उपाध्यक्ष आशा विजय पाटील, सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील, संचालक प्रा.डी.बी.देशमुख,
सर्व कार्यकारी मंडळ,गव्हर्निग कोन्सिल मंडळ,व विश्वस्त मंडळ सदस्य तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल. चौधरी, उपप्राचार्य प्रा.एन.एस. कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे, प्र. रजिस्ट्रार दिनेश मधुकर पाटील,उपप्राचार्य प्रा.बी एस.हळपे व पर्यवेक्षक प्रा.एस.पी.पाटील,समन्वयक प्रा.ए.एन.बोरसे,जुकटोचे अध्यक्ष प्रा.संदीप भास्कर पाटील,सचिव प्रा.अतुल पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले. विद्यापीठाच्या विद्यापरिषद सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल विद्यापीठ परिसरातून देखील त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More