चोपड्याला डॅा.सुशिलाबेन शहा वाचन कट्टयाचा प्रारंभ
# चंद्रहास गुजराथींचा सत्कार
# नगर वाचन मंदिराचा उपक्रम

चोपड्याला डॅा.सुशिलाबेन शहा वाचन कट्टयाचा प्रारंभ
# चंद्रहास गुजराथींचा सत्कार
# नगर वाचन मंदिराचा उपक्रम

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी

चोपडा – येथील तालुका वाचनालय नगर वाचन मंदिरात चोपडा साखर कारखान्याचे नवनिर्वाचित चेअरमन चंद्रहास गुजराथी यांचा सत्कार आणि स्व.डॅा.सुशिलाबेन शहा वाचन कट्टयाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी वाचनालयाच्या अमरचंद सभागृहात चोसाका व पीपल्स बॅकेंच्या चेअरमनपदी भुषणावह निवड झाल्याबद्दल चंद्रहास गुजराथी यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष आशिष गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच वाचनालयाच्या माजी अध्यक्षा स्व.डॅा.सुशिलाबेन शहा ‘वाचन कट्टा’ शुभारंभ करण्यात आला.त्याचे पहिले पुष्प उपाध्यक्ष प्रा.एस.टी.कुलकर्णी यांनी गुंफले.त्यांनी रविंद्र भट लिखीत ‘इंद्रायणी काठी’ या कादंबरीचे परिक्षण यांनी विषद केले.ज्ञानेस्वराच्या जीवनाचा आलेख यात आला असल्याचे सांगत आध्यात्मिक वाचनीय कादंबरी असल्याचे त्यांनी सांगितले.तर चंद्रहास गुजराथी यांनी तालुक्यात चोसाकाचे माध्यमातून अर्थक्रांती आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून मला मिळालेल्या यशात सर्वांचा वाटा असल्याचे सांगितले.


यावेळी सुत्रसंचालन कार्यवाह गोविंद गुजराथी यांनी केले.कार्यक्रमास कार्यवाह डॅा.परेश टिल्लू,संचालक
सोमनाथ बडगुजर,डॅा.सुभाष देसाई,किरण गुजराथी,श्रीकांत नेवे,ॲड.अशोक जैन,संजय गुजराथी,स्नेहल पोतदार,प्रभाकर महाजन,रजनी सराफ,विद्या अग्रवाल,विलास एस.पाटील,अविनाश कुलकर्णी तसेच ग्रंथपाल गोपाळ दांडेकर,रमेश सोनार,जोशी,लाड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More